Top News

Police raid on illegal ganja man in Bramhapuri

ब्रम्हपूरी मध्ये अवैधरीत्या गांजा बाळगणाऱ्यावर पोलिसांचा छापा.......


1.882 कि.ग्रॅ. गांजा जप्त ....आरोपी पोलिसांच्या ताब्यात.....



 विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपूरी 

ब्रम्हपूरी शहरातील कुर्झा वार्ड येथे राहणाऱ्या विनायक शिवराम चोले याचे घरी पोलीसांनी छापा टाकून त्याचे घरातून 1.882 कि.ग्रॅ. गांजा ज्याची अंदाजी कींमत 4000 रू. असा मूद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस ताब्यात घेउन त्याचेवर कार्यवाही करण्यात आली आहे.

दि. 03/12/2022 रोजी 3.52 वाजताच्या दरम्यान ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली कि, रीकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विनायक शिवराम चोले, रा. कुर्झा वार्ड, ब्रम्हपूरी याचे राहते घरी अवैधरीत्यारीत्या गांजा ठेवून असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यावरून पोलीसांनी पंचासह त्याचे घरी छापा टाकला असता त्याचे घरात कॉलेज बॅगमध्ये लपवून ठेवलेला 1.882 कि.ग्रॅ. गांजा अं.कि. 4000 रू. पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेउन मालासह पोलिस स्टेशनला आणण्यात आले. त्याचेवर अप. क्र. 595/ 22 कलम 20 (ब) एन.डी.पी.एस. ॲक्ट सन 1985 अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले.

सदरची कार्यवाही मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे पोलिस निरीक्षक रोशन यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे, महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर, नापो / 1734 योगेश शिवनकर, नापो / 2552 मुकेश गजबे, पोशी / 2332 संदेश देवगडे, मनापोशी / 580 शुभांगीनी शेमले यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पूढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

Previous Post Next Post