सावळी सदोबा परीसारातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीकडून थट्टा......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीकडून थट्टा झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे,सततच्या अतिवृष्टीमुळे यावर्षी सावळी सदोबा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक सोयाबीन,कपाशी,तूर यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पिक विमा कंपनीच्या नियमानुसार, 72 तासांच्या आत भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली, त्यानंतर पिकाची नुसकान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे सुरू झाले मात्र सावळी सदोबा परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यात नाममात्र रक्कम विमा कंपनीने जमा केल्याने एक प्रकारे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे कर्ज काढून पेरणी केलेल्या पिकांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर नुस्कान झाल्याने पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली काही दिवसानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे करण्यात आला पण हे सर्वेक्षण केवळ नावालाच राहिले किमान जी रक्कम पिक विम्यासाठी भरली तेवढी रक्कम सुद्धा मिळाली नाही,तर काही हातावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना किमान नुकसान भरपाई मिळाली त्यामुळे सावळी सदोबा परिसरातील शेतकरी वर्गात विमा कंपनी विरोधात संतापाचे वातावरण आहे याबाबत शेतकरी पिक विमा कंपनी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

