Top News

Forest department succeeded in catching the tiger that was causing terror in Paharni area.

पहार्णी परिसरात दहशत निर्माण करणार्या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश.......


नागभिड तालुक्यात चौघांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद......

विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यात धुमाकूळ घालणारा पट्टेदार नर जातीचा वाघाला काल शनिवारी 3 डिसेंबर ला दुपारच्या नागभिड पनपरिक्षेत्रातील मिंडाला उपवनक्षेत्रातील मसली नियतनक्षेत्रात सशस्त्र पोलिसांच्या पथकाने डार्ट मारून बेशुध्द केले नंतर त्याल्या पिंजऱ्यात जेरबंद  करण्यात आले.

हेही वाचा 👉🏻 मोठी बातमी...चंद्रपूर जिल्हातीली सोन्याची खाण ही 200 कीलो मीटर परिसरात........


 नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या गावातील  दीड महिन्यात चार जणांचा बळी घेतला आहे. वाघाला जेरबंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

हेही वाचा 👉🏻 मोठी बातमी...चंद्रपूर जिल्हातीली सोन्याची खाण ही 200 कीलो मीटर परिसरात........

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रम्हपूरी व नागभिड तालुक्यात बरेच दिवसांपासून नर जातीचा पट्टेदार  वाघाने (वाघचे नाव - पिट 2) नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील वनिता वासुदेव कुंभरे (पाहर्णी ) ही महिला शेतात गवत आणण्यासाठी गेली असता त्यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर ढोरपा जवळ असलेल्या टेकरी या शेतशिवारात तोरगांव येथील वाघाच्या हल्यात महिला ठार झाली होती. 

तर याच आठवड्यात ढोरपा येथील सविता भुरले या महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे इरव्हा (टेकरी), मौशी, ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या परिसरात वाघाची चांगली दहशत पसरली होती. शेतकरी शेतमजूर व नागरिकांच्या जिवाकरीता पट्टेदार वाघापासून धोका निर्माण झाल्याने  डार्ट मारून जेरबंद करण्यचे आदेश नागपूरचे मुख्य वन्यजिव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (जीव) यांनी दिला होता. तेव्हा पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सशस्त्र पोलिस अजय मराठे व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत तुपकर वाघावर पाळत ठेवून होते.

हेही वाचा 👉🏻 मोठी बातमी...चंद्रपूर जिल्हातीली सोन्याची खाण ही 200 कीलो मीटर परिसरात........

दि.३/१२/२०२२ ला दुपारी नागभिड वनपरिक्षेत्रांतर्गत मिंडाळा उपवनक्षेत्रातील मसली नियतक्षेत्रात दुपारच्या सुमारास वाघ आढळून आला. सशस्त्र पोलिस  अजय मराठे यांनी अचूक निशाना साधून डार्टने त्याला बेशुध्द केले. त्यांनतर अर्धातासांनी त्याला पिंजऱ्यात सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले. वाघाला जेरबंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी व स्थानी नागरीकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

जेरबंद करण्यात आलेला नर जातीचा वाघ अडीच ते तीन वर्ष वयाचा आहे. त्याला पुढील तपासणीकरीता चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर मध्ये हलविण्यात आले आहे. सदर वाघाला जेरबंद करण्याची कार्यवाही सहायक वनसंरक्षक धोंडणे, वनक्षेत्रपाल हजारे, ताडोबा आर आर डी प्रकल्पाचे दांडेकर, मोहूर्ले, नन्नावरे, तिखट, कोरपे, आहूजा, दांडेकर यांचे उपस्थिती ही कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा 👉🏻 मोठी बातमी...चंद्रपूर जिल्हातीली सोन्याची खाण ही 200 कीलो मीटर परिसरात........

Previous Post Next Post