मोठी बातमी...चंद्रपूर जिल्हातीली सोन्याची खाण ही 200 कीलो मीटर परिसरात........
कसा लागला शोध? जानुन घ्या....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
महाराष्ट्राच्या व विदर्भाच्या भूर्गाभात कोळसा, बॉक्साईट, आयर्न यासारख्या खनिजांबरोबरच सोनेही दडले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी या भागातील भूर्गभात सोन्याचे दोन खाणी आढळून आल्या आहेत.
या भागातील भूर्गाभात तांबेही असून या भागातून सोनेही मोठ्या प्रमाणात मिळू शकते, असा केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागातील सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे कोकणातीलत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहितीही आहे.
राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता.
राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना आदी उपस्थित होते.
राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूरची सोन्याची खाण 200 किमी परिसरात....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हा सोन्याचा साठा स्वतंत्र नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये तांब्याचा मोठा साठा मिसळलेला आहे. याबाबत सखोल संशोधनाची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठावर असलेल्या गोंडपिपरी ते चिमूर तहसीलपर्यंत सुमारे २०० किलोमीटरच्या परिसरात हा तांब्या-सोन्याचा साठा पसरलेला आहे.
नुकत्याच सापडलेल्या सोन्याच्या साठ्याचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये अभ्यास करण्यात आला. त्याचा अहवाल केंद्रीय खाण मंत्रालयाला नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, मध्य क्षेत्र, नागपूर यांनी सादर केला होता.
दरम्यान हा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला आहे. दोन भूवैज्ञानिकांनी हा अभ्यास केला आहे. ज्यात बामणी आणि मिनझरी यांची तपासणी केली.
केलेल्या अभ्यासात, जी ४ अंतर्गत २.५ चौरस किमी व जी ३ अंतर्गत १.८५ चौरस किमी आणि १७४६.९ मीटर खोलीपर्यंतच्या खनिज स्थितीचा शोध घेतला गेला आहे.
जी ३ अंतर्गत बामणीमधील ०.४ चौरस किमी आणि मिनझरी ब्लॉकमधील १.८५ चौरस किमी क्षेत्राचे मूल्यांकन केले. ज्या अंतर्गत मिनझरी ब्लॉकमध्ये तांब्याचे प्रमाण २६ पीपीएम (पार्ट प्रतिमिलियन) ते २३०० पीपीएम आढळले आहे. सोन्याचे प्रमाण २५ पीपीबी (प्रतिअब्ज भाग) ते ११० पीपीबीपर्यंत आढळले आहे. तर बामणी ब्लॉकमध्ये तांब्याचे प्रमाण ३३५ पीपीएम ते २४०० पीपीएम दाखवते असा प्राथमीक अंदाज खनिकर्म विभागाचा आहे.



