Top News

Inauguration of public accessible toilets at Kalmana.

कळमना येथे सार्वजनिक सुलभ शौचालये उद्घाटन. 



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक सुलभ शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील स्वच्छता व आरोग्य सुदृढ राहण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कळमना येथे कळमनाचे सरपंच,  अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी सार्वजनिक शौचालयासाठी निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या प्रयत्नांने येथे सार्वजनिक शौचालय उभे राहिले आहे. सरपंच वाढई हे कळमना येथे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गाव स्वच्छ सुंदर हिरवेगार व आरोग्यदायी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा व आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा मानस असतो. याच भुमिकेतून आज या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले. 

         या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे, साईनाथ पिंपळखिंडे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, प्रियंका गेडाम, ग्रामसेवक नारनवरे, मुरलीधर पेंदोर, महादेव आंबीलकर, कर्म पुरुष अटकारे, अनिल मेश्राम, देवराव सिडाम, श्रावण गेडाम, नथू वसाके, विशाल नागोसे, शिपाई सुनील मेश्राम यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post