युवासेना सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे यांच्या सहकार्याने मध्यरात्री ओडिसा येथे खेळासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मीळाला दिलासा.......
गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचा पुन्हा एक निष्काळजीपणा आला समोर.......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
विद्यापीठ स्थारिय क्रीडा स्पर्धा ओडिसा येथे आयोजित असतांना गोंडवाना विद्यापीठाकडून या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची निवड यादी Mail ने पाठवल्यामुळे विद्यापीठांच्या खेळाडूंना रात्रीचे ९ वाजता सुमारास स्पर्धेत सहभाग घेण्यास नकार देण्यात आला, ही बाब जतिन मत्ते नामक एका युवकाच्या लक्षात येताच त्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त विद्यापरिषद सदस्य(SENET) तथा माजी युवासेना जिल्हा प्रमुख प्रा.निलेश र.बेलखेडे यांच्या लक्षात आणून दिली व त्यांनी रात्रीचं याच गांभिर्य समजून त्वरित विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याशी संपर्क साधून रात्री च्या वेळीचं यादी ओडिसा येथील स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांना मेल करायला विनंती करून हा प्रश्न रातोरात निकाली काढला आणि विद्यापीठाच्या ओडिसा येथे सर्व विद्यार्थ्यांचा स्पर्धेसाठी मार्ग मोकळा करुन दिला.
विद्यार्थ्यांची समस्या जाणून मदतीसाठी धावून आल्यामुळे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सिनेट प्रा. निलेश बेलखेडे यांचे मनापासून आभार मानले.युवा कर्तव्यदक्ष सुशिक्षित नेतृत्व, सर्व सामान्य युवकांचा आवाज विद्यापिठात गेल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या आता नक्कीच निकाली लागणार यात तिळमात्र पण शंका नाही असे मत पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केलज आहे.
याबाबत सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गोंडवाना विद्यापिठाच्या क्रीडा विभागाकडून यापुर्वी सुद्धा विद्यापीठ विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल कुलगुरू डॉ. बोकारे यांच्याशी काॅल वर चर्चा नाराजी व्यक्त करीत , आपण सदर विभागाशी चर्चा करून संबंधित कर्मचारी यांना समज द्यावी असे म्हटले.गोंडवाना विद्यापिठातील खेळासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदैव होणाऱ्या गैरसोयीचा प्रकार आपण विद्यापिठ बैठकीत घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
