Top News

Organizing a program on the occasion of Rashtrasant Tukdoji Maharaj's death anniversary at Kalmana...

कळमना येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन... 


विदर्भ माझा न्युज 24 -  राजुरा 



 राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी कळमना येथे दोन दिवसीय कार्यक्रम घेतला जातो. कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.  या प्रसंगी ते म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा कळमना या गावात प्रभाव आहे. महाराजांच्या ग्रामगीतेचा आणि शिकवणीचा जिवन जगताना खुप फायदा होतो. त्यामुळे त्यांच्या विचारांची कास भावी पिढीने धरली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

          या प्रसंगी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या कावळे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ह भ प मिनाथ महाराज नाराडा, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळसेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, माजी सरपंच सुधाकर पिंपळशडे, राष्ट्रसंताचे जेष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पिंगे, दत्तू जी पिंपळसेडे, कवडु पाटील पिंगे, विठ्ठलराव वाढई, महादेव पाटील पिंगे, लटारी बल्की, महादेव आंबिलकर, अशोक कावळे, भाऊराव कावडे, नथू वळसकर, अविनाश निमकर, नानाजी आंबिलकर, मारुती अटकारे, देविदास उमाटे, आनंदराव वांढरे, नवनाथ ताजने, एकनाथ  इदे, वसंता सपाट, उद्धव ताजने, गजानन गौरकर, सुनील बोडाले तसेच भारुड महिला भजन मंडळ चिंचोली खुर्द, जैतापूर, बोडगाव या गावातील भजन मंडळी उपस्थित होते. न्यू पदावली भजन मंडळ कळमना तथा समस्त कळमना गाववाशीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post