Top News

Now for the state of Vidarbha, for Vidarbha lovers The fight has started.

आता विदर्भ राज्याकरिता विदर्भावाद्यांची आर-पारची लढाई सुरु.......


स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता विदर्भवाद्यांच्या आंदोलनाची मालिका जाहीर.......




 विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर ग्रामीण व नागपूर शहराची बैठक आज दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ ला विराआस मुख्यालय गिरीपेठ, नागपूर येथे नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुधा पावडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली, बैठकीत वि.रा.आ.स नागपूर मुख्यालयी १९ ऑक्टोबर २०२२ ला झालेल्या कोअर कमेटी व विदर्भ स्तरीय कार्यकर्ता बैठकीच्या निर्णयाप्रमाणे “स्वतंत्र विदर्भ” राज्याच्या आंदोलनाकरीता आर-पारची लढाई सुरु झाली असून मिशन २०२३ संपेपर्यंत “अभी नही तो कभी नही” या इर्षेने विदर्भवाद्यांनी घटनेतील कलम ३ प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीची जवाबदारी हि केंद्र सरकारची व संसदेचीच असल्यामुळे केंद्र सरकार बरोबरच विदर्भातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या १० हि खासदारांनी विदर्भ राज्य निर्मिती बाबत त्यांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? हे जाहीरपणे स्पष्ट करण्यास भाग पाडण्याकरीता विदर्भातील १० हि खासदारांना त्यांच्या-त्यांच्या मतदार संघातील विदर्भवादी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या पुराव्यासह पोष्टाद्वारे व इ-मेलद्वारे १० नोव्हेंबर पर्यंत पत्रव्यवहार करण्याचे आंदोलन करणार आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील १० खासदारांना जाहीरपणे ते त्यांच्या खासदारकीच्या कालावधीत सत्ताधारी पक्षाचे (भाजपाचे) खासदार असूनही व त्यांच्या पक्षाने व त्यांच्या नेत्याने विदर्भातील जनतेला २०१४ साली सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे जाहीर अभिवचन दिले होते  व या मागणीकरिता विदर्भवाद्यांना लेखी पत्र देऊन आमगाव ते खामगाव विदर्भ निर्मितीचा बेंबीच्या देठापासून जागर केला होता. परंतु २०१४ व २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर सत्तेत येऊन हि विदर्भाचे राज्य मिळवून देण्यास सरकार म्हणून व लोक प्रतिनिधी म्हणून अपयशी ठरले आहे. जनतेच्या आशा आकांक्षा धुळीस मिळवल्या म्हणून त्यांनी खासदार म्हणून खुर्चीत राहण्याचं अधिकार गमावल्यामुळे त्यांचा

दि.११/११/२०२२ रोजी त्यांच्या कार्यालयावर जाऊन जाहीरपणे  राजीनामा मागणार आहे. तसेच विरोधी पक्षाचे खासदारांनी सांसदीय आयुध्ये उपलब्ध असतानाही “निंदकाचे घर असावे शेजारी” हा त्यांचा लोकशाहीतील रोल असतानाही त्यांनी हि मागणी संसदे पुढे प्रकाशझोतात आणून  सरकारला नागडे (expose) करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनीही खासदाराचे खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावला असल्यामुळे त्यांचाही त्याच दिवशी राजीनामा जाहीरपणे मागितला जाणार आहे. २ वर्ष्यांच्या कोरोना या महामारीच्या संकटानंतर व सत्तांतरानंतर राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. १९/१२/२०२२ रोजी नागपूर येथे घेण्याचा निर्णय विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने व सरकार ने घेतला आहे. २०१४ साली भाजपाचे तत्कालीन प्रांताध्यक्ष देवेंद्र फडणवीस व सुधीर मूनगंटीवार हे राज्याच्या सरकार मध्ये आहेत त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची केंद्र सरकार कडून परिपूर्ती करून घेण्याच्या दृष्टीने व विदर्भातील जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिक असलेले “विदर्भ राज्य” निर्माण करण्याकरीता त्यांच्याच पक्षाचे केंद्रात सरकार असल्यामुळे व त्यांच्याच पक्षाचे नागपूरचे खासदार असलेले नितीन गडकरी हे भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिले असून केंद्रात मंत्री आहेत व राज्य निर्मितीचा अधिकार केंद्र सरकार व संसदेचाच असल्यामुळे केंद्र सरकारला भाग पाडावे याकरिता विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (१९/१२/२०२२) विधीमंडळावर “हल्ला बोल आंदोलन” करणार असून आर-पारच्या लढाईचा बिगुल वाजवणार आहे.

आजच्या बैठकीत १० नोव्हेंबर पर्यंत नागपूर लोकसभा खासदार  नितीन गडकरी यांना २ हजार पत्र पाठविले जाणार असून, तसेच रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांना १ हजार पत्र पाठविण्याचे ठरले, तसेच ११ नोव्हेंबरला गडकरी यांच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ असलेल्या कार्यालयावर राजीनामा मागण्या करीता छत्रपती चौक येथून मोर्चाच्या स्वरूपात दुपारी १२ वाजता जाणार व खासदार तुमाने यांच्या कार्यालयावर भांडेप्लॉट चौकातून राजीनामा मागण्या करीता मोर्चा स्वरूपात जाणार आहे.

याबैठकीला युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी विष्णुजी आष्टीकर, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, अशोक पाटील, नागपूर विभाग महिला आघाडी अध्यक्षा रेखा निमजे, गुलाबराव धांडे, अरविंद भोसले, नागपूर दुर्बल घटक आघाडी अध्यक्ष ज्योती खांडेकर, पूर्व नागपूर अध्यक्ष संजय मुळे, शोएब अहमद संगठन मंत्री मध्य नागपूर जय विदर्भ पार्टी, गणेश शर्मा, नरेश निमजे, राजेंद्र सतई, श्याम लुटे, वसंतकुमार चौरासिया, कांचन करांगळे, माधुरी चव्हाण, संध्या चौरासिया, संतोष खोडे, पुरुषोत्तम परतेकी, वसंतराव वैद्य, श्रीकांत दौलतकार, दिनेश मुळे, ललित पवार, सुशीलकुमार चौरासिया, आनद निखारसह आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post