Top News

Vidarbha supporters will demand the resignation of MPs from Vidarbha tomorrow.

विदर्भवादी मागणार उद्या विदर्भातील  खासदारांचे राजीनामे .......


संपूर्ण विदर्भात विदर्भवादी काढणार  खासदारांच्या कार्यालयावर मोर्चे.......


खासदारांकडे करणार त्यांच्या राजीनाम्याची मागणी...........  




विदर्भ माझा न्यूज 24 - नागपूर 


विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर लोकसभा क्षेत्र खासदार  नितीन गडकरी तसेच रामटेक लोकसभा क्षेत्र खासदार  कृपाल तुमाने  चंद्रपूर लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर सह विदर्भातील सर्व  लोकसभेचे खासदार  यांच्या कार्यालयावर जाऊन शुक्रवार, दि :- 11 नोव्हेंबर 2022 ला "राजीनामा मागणीचे आंदोलन" केले जाणार आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या :-

1) केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे.

2) राजीनामा द्या राजीनामा द्या खासदार साहेब राजीनामा द्या.

3)विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी व शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडिंग बंद करावे.

4) अन्न धन्यावरील G.S.T तात्काळ रद्द करावी.

5) बल्लारपूर, सुरजगढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा.

6) विदर्भातील 11 ही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

       खासदारांच्या  राजीनामा मागणी करता दु :-11:30 वाजता  विदर्भवादी आप आपल्या शेत्रात  जमा होऊन मोर्च्याच्या स्वरूपात खासदारांच्या  कार्यालयावर जाणार आहे.

Previous Post Next Post