Top News

Jalakumbh Bhumi Pujan ceremony concluded under the leadership of MP Ashok Nete....

जलकुंभ भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात संपन्न.....




 विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली 


खासदार अशोक नेते यांनी जलकुंभ भूमिपूजन सोहळ्याच्या उद्घाटक प्रसंगी बोलतांना ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लवकरात लवकर जलकुंभ उभारावे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

या प्रसंगी खासदार अशोक नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चा,आमदार डॉ.देवराव होळी, सरपंच दशरथ चांदेकर,माजी सभापती मारोतराव ईचोडकर,माजी उपसभापती विलास दशमुखे, कार्यकारी अभियंता अमित तुरकर, उप.वि.अभियंता अनिल कोटनाके, उपसरपंच राजेंद्र खंगार,गट.वि.अ. साळवे साहेब, ग्रा.विकास अधिकारी मोगरकर,कंत्राटदार रितेश गडपल्लीवार,नदुजी पा.मांदाळे माजी सरपंच,प्रकाश मुद्दमवार बांधकाम सभापती,कीर्ती कुमार मासुरकर माजी ग्रा.प.सदस्य,से.नि.उप.निरिक्षक लोहबरे साहेब, माजी उपसरपंच उर्मिलाताई चौधरी, ग्राम.सदस्या मुरखडा (नवेगांव) पुष्पाताई उमरे, स्वाती राऊत,रेखाताई डोनाडकर, शुभांगीताई मोहुरले,शैला कोकोडे, सुप्रिया गायकवाड,तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post