Top News

Selection of players from Shri Maharshi Vidya Mandir, Chandrapur in District Level Chess Tournament.....

श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूर येथील खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड.....


विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय (म.रा.) पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर   जिल्हा क्रीडा परिषद , चंद्रपूर व चंद्रपूर शहर महानगरपलिका, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा चंद्रपूर येथील खेळाडू प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांच्या अथक प्रयत्नांनी बरेच शाळेचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा दिनांक १८ नोव्हेंबरला जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर पार पडली.

सदर स्पर्धेत श्री महर्षी विद्या मंदिर , मुख्य शाखा दाताळा रोड , चंद्रपूर येथील एकूण १४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यापैकी U-१४ स्पर्धेमध्ये कु.अर्पिता गणेश गुप्ता वर्ग ८ , कु.राधिका सचिन गायकवाड वर्ग ७ कु. हृदयी वैभव साठे वर्ग ७ व U-१७ स्पर्धेमध्ये कु. अदिती मोनीश शर्मा वर्ग ११ , या खेळाडूंची दिनांक २३ ते २५ नोव्हेंबरला होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. सदर  खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून कु. रुचिता आंबेकर हिचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर व्यवस्थापक म्हणून श्री. दिनेश कोयचाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या कौशल्यावरून त्यांच्या प्रशिक्षकांची सुद्धा नावलौकिक झाली. सदर  खेळाडूंना शाळेतील क्रीडा प्रमुख श्री दिनेश कोयचाडे व श्री रुपेश बोडे , श्री नितेश शिरसागर व कुमारी रुचिता आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती मॅडम यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाडूंचे व शाळेतील क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक , सचिव दत्तात्रय  कंचर्लावार , सर्व सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी  खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post