Top News

182 citizens examined in cataract and surgery camp at Nandaphata....58 patients will undergo surgery.....

नांदाफाटा येथील मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिरात 182 नागरिकांची तपासणी....58 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया.....


सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



औद्योगिक नगरी नांदा येथे लॉयन्स सेंटर सेवाग्राम,वर्धा, लॉयन्स क्लब चंद्रपूर महाकाली, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर, स्वामी विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा, कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर व गुरुदेव सेवा मंडळ कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने  सांस्कृतिक भवनाचे इमारतीत दिनांक 19 नोव्हेंबरला विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंद शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात औद्योगिक परिसरातील 182 नागरिकांची सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली यातील 46 रुग्णांना कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंद शस्त्रक्रियेकरिता बसद्वारे सेवाग्राम मेडिकल कॉलेजला नेण्यात आले सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे  12 रुग्णांना दिनांक 22 नोव्हेंबरला रोजी शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहेत

 वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद महाराज यांच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करून शिबिराचे विधिवत उद् घाटन करण्यात आले याप्रसंगी आयोजित  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब चौधरी, उद् घाटक ह.भ. प्र. श्री डाखरे महाराज, विशेष प्रमुख अतिथी लॉयन्स क्लब व महावीर इंटरनॅशनलचे पदाधिकारी श्री पूनमजी तिवारी, श्री हरीशजी मुथा, श्री देवेंद्रजी वर्मा, डॉ.स्वप्नेश चांदेकर,स्मार्ट व्हिलेज बीबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, नांदा ग्रामपंचायतच्या सदस्या आशाताई खासरे, प्रिया काळे, प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरिक मारोती जमदाडे,मारोती बुडे,मनोज शेरकी,बंडू वरारकर माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर राऊत, रूपाताई पानघाटे, सुवर्णा झाडे मंचावर उपस्थित होते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कॅलिबर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर यांनी प्रास्ताविक केले कोरपना तालुक्यामध्ये नेत्र रुग्णांची संख्या अधिक असल्याने अनेक ठिकाणी अशा प्रकारचे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले

 नांदा येथील एजाज अल्ताफ शेख, चेतन सुभाष आत्राम, शुभम इटनकर या तीनही होतकरू युवकांच्या मेहनत, जिद्द,चिकाटी व कौशल्याच्या बळावर त्यांची  नुकतीच भारतीय सैन्यामध्ये निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते  त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला  नितेश मालेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले विविध संघटनांनी व प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनामुळे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर घेण्याकरिता सहकार्य लाभल्याने अभय मुनोत यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले

 स्वामी विवेकानंद मंडळ नांदाचे संस्थापक पुरुषोत्तम निब्रड, हारुण सिद्दिकी, अरविंद इंगोले, गणेश लोंढे,राजू मोहितकर, महेश राऊत, प्रवीण पोटवडे, सचिन बोढाले,विवेक खनके,हरीश खंडाळे, शोएब शेख,रतन ठाकरे,राजू काळे,शंकर राऊत, सोनू बेग, अश्विन कस्तुरे, प्रफुल बोढाले, स्वप्निल कस्तुरे,साईनाथ इटणकर,अशोक क्षीरसागर या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम केले शिबिरात तपासणी करिता आलेल्या नागरिकांची योग्य ती व्यवस्था युवक मित्रांनी केली परिसरातील नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

Previous Post Next Post