Top News

Breaking News___Eicher_Truck overturns in water from Wardha river bridge on Balharshah Rajura Marg.

Breaking News__बल्हारशाह राजुरा मार्गावरी वर्धा नदी पुलावरून आयचर_ट्रक पान्यात पलटली.......


 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 



राजुरा व बल्हारशाह शहराला जोडण्यासाठी वर्धा नदीवर पूल असून सदर पूल सद्यस्थितीत धोकादायक बनत चालला आहे पावसाळ्याच्या दिवसात या पुलावर लावलेले कठडे काढून ठेवले जातात जे पावसाळा संपताच पूर्ववत लावले जातात मात्र ते कठडे अध्यापही लावले गेले नाही.कठड्यांच्या नावावर लोखंडी पाईप लावल्या गेली आहेत
. वर्तमान स्थितीत या पुलावर लहान मोठे अपघात होऊन अनेकांचा जिव गेल्याचा घटना घडल्या आहेत. 

अशीच काहीशी घटना आज दि.२८/११/२०२२ ला पहाटेच्या सुमारास घडल्याचं वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार आज पहाटे राजूरा येथून सिमेंटच्या बोऱ्यानी भरलेला ट्रक क्र MH 34 TZ 1106 राजुरा पुलावरून जात असतांना तोल गेल्यामुळं वर्धा नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली सदर अपघात हा गाडी अतिवेगामुळं घडला की दुसऱ्या गाडीला वाचविण्यासाठी ट्रकचा तोल बिघडला याबाबत अधिकची माहीती मिळाली नाही मात्र या घटनेमुळे ट्रक चालक/वाहका चा म्रुत्यु झालाची माहीती असून,


चंद्रपूर पोलिसांच बचाव पथक वर्धानदी वर दाखल होऊन पाण्यात चालकाचे शव बाहेर काढले असुन त्याचा सह आणखी कुणी सोबत आईचर मध्ये होत का या गोष्टीचा शोध घेणे सुरु आहे, बल्हारशाह राजुरा ला जोडनारा वर्धानदीचा पुल आता जिव घेणा ठरत असल्याची सर्वस्त्र चर्चा आहे.

या पुलाची मुद्दत संपली असुन सुद्धा या मार्गावर नव्या पुलाच्या बांधनी करीता स्थानीक लोकप्रतिनिधी व प्रशासन योग्य ती हालचाल‌ करतांना व गंभीर दिसत नसल्याची चर्चा समाजबांधवानमध्ये सुर असल्याच पहायला मिळत आहे.

PWD विभागाच्या निष्काळजी पना मुळे घटना वाढत चाल्या आहे,या पुला वरून रोज अनेक वाहन तसेच जडवाहतुक ये - जा करीत अस्तात या असुरक्षीत पुलावर होत असलेल्या जिवीत हानी बघता PWD वर कार्यवाही करण्याची मागनी सध्या नागरीक करीत आहे‌त.

Previous Post Next Post