राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेत प्रेम जरपोतवार ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर
सोशल एज्युकेशन मुव्हमेंट ( SEM) युनिट – चामोर्शी जि. गडचिरोली तथा नेहरू युवा केंद्र जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान महाराष्ट्र राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा २०२१ ही स्पर्धा लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये राज्यभरातून शाळा, सामाजिक संस्था व वैयक्तिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.संविधान जागर स्पर्धा या स्पर्धेत संविधान दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे उत्तम संयोजन व सादरीकरण केल्याबदल सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडावार कॉलेज ऑफ सोशल चंद्रपूर येथे एम एस डब्ल्यू प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रेम नामदेव जरपोतवार याने द्वितीय क्रमांक पटकावला.
संविधान जागर स्पर्धा या स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ ला लुंबिनी बौद्ध विहार चामोर्शी येथे दिनानिमित्त संविधान जागर स्पर्धा बक्षिस वितरण व प्रबोधन कार्यक्रमात देण्यात आले.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाच्या बक्षीसाचे स्वरूप ७ हजार रुपये होते. याप्रसंगी ३५०० हजार रोख, ३५०० रुपयांची ग्रंथ व सन्मानचिन्न या स्वरूपात देत संविधान अभ्यासक डॉ. के प्रेमकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
