Breaking News..राजुरा बस स्थानकचा काही भाग ढासळला......एक प्रवासी जखमी....
बल्हारशाह रेल्वे स्टेशनची घटना ताजी असतांनाच जिल्हात पुन्हा एका घटने मुळे सर्वस्त्र खळबळ........
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
बल्हारशाह रेल्वे स्थानकावरील प्लाकफार्म क्र. 1 ते 5 ला जोडनारा फुटओव्हर ब्रिज चा भाग कोसळल्याने जवळपास 12 ते 15 प्रवासी जखमी तर एका महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता राजुरा बस स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडल्याने सवस्त्र खळबळ माजली आहे.
हेही वाचा :- 👉🏻 बल्हारशाह रेल्वे स्टेशन चा ब्रीज ढासळला......अनेक प्रवासी जखमी असल्याची माहीती.......
राजुरा बस स्थानक जीर्ण अवस्थेत असुन बस स्थानकाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांनी बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे आदेश दिले होते. त्याच कालखंडात बस स्थानकाचे भूमीपूजन देखिल करण्यात आले होते मात्र सत्ता बदलानंतर बस स्थानकाच्या इमारतीचे काम ठप्प पडले आहे. पावसाळ्यात बस स्थानकाचे छत गळत होते बस स्थानकावर पाणी साचुन राहायचे तरीही बस स्थानक प्रमुखांनी ह्याची दखल घेतली नसल्याचे आढळुन येत आहे.
आज सकाळी 11:00 11:15 च्या दरम्यान राजुरा बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 व 3 च्या वरच्या मागील भागाचे छत अचानक ढासळले. वास्तविक बघता ह्या वेळी बस स्थानकावर विद्यार्थ्यांची गर्दी असते मात्र दुर्घटनेच्या वेळी त्या भागात विशेष गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली तरीही पडणाऱ्या छताचा मलबा एका व्यक्तीच्या अंगावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला असुन तो व्यक्ती स्वतःच उपचारासाठी दवाखान्यात निघुन गेला असल्याची माहीती आहे.
हेही वाचा :- 👉🏻 बल्हारशाह रेल्वे स्टेशन चा ब्रीज ढासळला......अनेक प्रवासी जखमी असल्याची माहीती.......
जिल्हात 24 तासाच्या आत घडलेल्या या दोन्ही घटने मुळे सर्वसत्र खळडळ माजली आहे.

