बल्हारशाह रेल्वे स्टेशन चा ब्रीज ढासळला......अनेक प्रवासी जखमी असल्याची माहीती.......
बल्हारशाह रेलवे स्टेशन वरती मोठी दुर्घटना ब्रिज पडल्याने 8
10 ते 12 यात्री जख्मी । 2 यात्री गंभीर असल्याची सुत्रांछी माहीती आहे । ही रेल्वे प्रशासनाची मोठी निक्ष्काळजी असल्याची बल्हारशाह शहरातील समाज बांधवांन मध्ये चर्चा आहे......
मध्य रेल्वे चे महत्वाचे स्थानक तसेच मध्य रेल्वे, दक्षिण पुर्व मध्य, तसेच दक्षिण रेल्वे च एक महत्वाचं जक्शन म्हणुन बल्लारशाह रेल्वे स्थानकाची ओळख आहे त्यामुळं बल्हारशाह स्थानकात सतत वर्दळ असते त्याच बल्हारशाह रेल्वे स्थानकावर आज सायंकाळी 5:00 वाजताच्या दरम्यान अपघात घडला बल्हारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 1 ते 5 ला जोडणाऱ्या ओव्हर ब्रिज चा काही अंशी भाग कोसळला असून त्यामुळं काही वेळ गोंधळ उडाला होता. विश्वसनीय सूत्रांच्या माहीती नुसार या अपघातात 10 ते 12 प्रवाशी जख्मी झाले असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय बल्हारशाह येथे उपचार सुरु आहे. विशेष बाब म्हणजे या अपघातात काही प्रवाशी गंभीर जख्मी झाल्याचं वृत्त आहे. तसेच जखमींची संख्या आणखी वाढू शकते.



