Top News

ग्रामविकासाकरीता गावातील लोकांचा सहभाग महत्वाचा - भास्कर पेरे पाटील......

ग्रामविकासाकरीता गावातील लोकांचा सहभाग महत्वाचा - भास्कर पेरे पाटील......

विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव

यावेळी ग्रामविकासाची संकल्पना  मांडताना पेरे पाटील यांनी पंचसूत्री दिली, शिक्षण आरोग्य पाणी, आर्थिक स्वयंपूर्णता आणि पर्यावरण महत्वाचे असल्याचे सांगितले, गावातील लोकांना जगविण्यासाठी झाडे जगविणे महत्वाचे आहे, प्रथा परंपरा एका दिवसात बदलनार नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागेल असेही ते म्हणाले, 

तुम्हाला पेरे यांचे व्याख्यान ऐकून थांबायचे नाही, पुढच्या वेळेला ते येतील तेव्हा अडेगाव आदर्श गाव म्हणून ओळखले जावे अशी इच्छा मंगेश पाचभाई यांनी व्यक्त केली,

गावाच्या विकासाकरिता गावकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, गावाचा विकास करण्यासाठी आमदार खासदार किंवा कोणते मंत्री येणार नाहीत तर तुम्हालाच त्यासाठी प्रयत्न करावे लागेल..त्यासाठी ग्रामपंचायतीला आर्थीकदृष्टया स्वयंपूर्ण करा, तुमच्या गावाला विकसित करण्यासाठी आपले काही देणे लागते याची जाणीव जेव्हा गावकऱ्यांना होईल तेव्हा तुमचे गाव आदर्श होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले,

ग्रामविकास महोत्सव समिती तर्फे बुधवार (तारीख ११) रोजी अडेगाव येथे भास्कर पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक मंगेश पाचभाई यांनी केले,

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाद्यक्ष संजय देरकर,गट विकास अधिकारी गजानन मुंडकर ,सभापती संतोष कुचनाकर ,सरपंच सीमा लालसरे,विनोद धोटे,विशाल ठाकरे

ऍड देवा पाचभाई,प्रवीण खांझोडे,सरपंच रुपेश ठाकरे, आदी परिसरातील सरपंच उपस्तीती होते

यावेळी ग्रामविकासाची संकल्पना  मांडताना पेरे पाटील यांनी पंचसूत्री दिली, शिक्षण आरोग्य पाणी, आर्थिक स्वयंपूर्णता आणि पर्यावरण महत्वाचे असल्याचे सांगितले, गावातील लोकांना जगविण्यासाठी झाडे जगविणे महत्वाचे आहे, प्रथा परंपरा एका दिवसात बदलनार नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागेल असेही ते म्हणाले, 

तुम्हाला पेरे यांचे व्याख्यान ऐकून थांबायचे नाही, पुढच्या वेळेला ते येतील तेव्हा अडेगाव आदर्श गाव म्हणून ओळखले जावे अशी इच्छा मंगेश पाचभाई यांनी व्यक्त केली,

कार्यक्रम यशस्वी करण्या करिता विजू लालसरे,संतोष पारखी,शंकर पाचभाई,राहुल ठाकूर,गणेश निब्रॅड,गणेश पेटकर गिरीधर राऊत ,विवेक पुरके ,संजय आत्राम,वंदना पेटकर,व समस्त ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले संचालन आशिष राऊत तर आभार प्रदर्शन मंगेश पाचभाई यांनी केले.

Previous Post Next Post