Top News

अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल

अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा -  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल



विदर्भ माझा न्युज 24 - मुल 



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार  शरदचंद्र पवार यांचे विरोधात फेसबुक पोस्ट मध्ये आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने शेअर केली. केतकी चितळे नी हि पोस्ट शेअर केल्या मुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांना मध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.अभिनेत्री केतकी चितळे नी हि पोस्ट शेअर करून दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे.मा. शरदचंद्र पवार साहेब यांना उद्देशुन बदनामीकारक, मानहानीकारक हि पोस्ट आहे.

शरदचंद्र पवार साहेब यांचे विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या सुचणे नुसार भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मुल शहर पोलीस  निरीक्षक श्री. सतीश राजपूत  यांच्या कडे केली आहे.या प्रसंगी मुल शहर तालुका अध्यक्ष किसन वासाडे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंघठे, प्रदीप देशमुख, संदीप तेलंग, सूरज टेकाम , भास्कर बुरांडे, सतीश गुरूनुले ,उपस्थित होते.

Previous Post Next Post