Top News

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्या करता काटोल येथील जनता सज्ज.....

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्या करता काटोल येथील  जनता सज्ज.....


काटोल ‌तालुका कार्यकारणी गठीत.......




विदर्भ माझा न्युज 24 - काटोल


स्वतंत्र विदर्भ राज्या करता सातत्याने प्रयत्नशील विदर्भ राज्य आंदोलन समिती काटोल तालुक्याच्या वतीने काटोल शहरात कट्टर विदर्भवादी धीरज मांडले यांच्या मार्गदर्शनात शनि मंदिर परिसरात तालुका कार्यकारणी बैठक 14/5/2022 ला सायंकाळी पार पडली, महाराष्ट्रात राहून विदर्भाला  62 वर्षात फक्त पिळवणूक मिळाली, मागील 20 वर्षात 47 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली यावर पक्ष -विपक्ष कोणीच बोलायला तयार नाही, काटोल तालुक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी चे उत्पादन होते परंतु त्याच्या प्रक्रिये करता एकही कारखाना नाही, शेतकरी दिवसन दिवस साहूकारांच्या जाळ्यात ओढला जात आहे, काटोल जिल्हा झाला पाहिजे याकरता वर्षनूवर्षांपासून जनतेची मागणी शुरु आहे परंतु एकही आमदार खासदार  जनतेच्या प्रश्नाबरोबर नाही असे चित्र आहे, बेरोजगारी, गरिबी दिवसन दिवस वाढत आहे, कारखाने नाही विकासाच्या नावावर जनतेचा छळ होत आहे, तेलंगणा 10 वर्षा अगोदर निर्माण झाला आणी आज तिथे 10 जिल्ह्याचे 32 जिले झाले आहे. आणी आज तेलंगणा येथे शेतकरी सुखी आहे, त्यांच्या मालाला भाव मिळत आहे,  बेरोजगारांच्या हाताला काम आहे, हे सर्व चित्र सांगायला पुरे आहे की छोटे राज्य सुखी राज्य, म्हणून काटोल तालुका स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात अग्रीम भूमिके मध्ये राहणार. 

......तालुक्याच्या बैठक  पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षते खाली पार पडली,अरुण केदार यांच्या हस्ते काटोल तालुका कार्यकारणी  गठित करण्यात आली. काटोल तालुका अध्यक्ष म्हणून दिलीप सूतोने, विधानसभा संपर्क प्रमुख बाबाराव वाघमारे , काटोल तालुका उपाध्यक्ष प्रवीण राऊत , विनोद गावंडे, काटोल शहर  महिला आघाडी अध्यक्षा कोकिळा जगदीश पाटील , नरखेड तालुका अध्यक्ष श्रीकांत डफरे , काटोल तालुका मार्गदर्शक धीरज मांधले, तालुका युवा आघाडी अध्यक्ष  चेतन उमाठे , काटोल शहर अध्यक्ष वीरेंद्र इंगळे , युवा आघाडी काटोल शहर अध्यक्ष किशोर राऊत, काटोल शहर उपाध्यक्ष चेतन नासरे, नागपूर जिल्हा सहसचिव पुखराज रेवतकर, पुंडलिक हरणे यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. 

बैठकीला प्रामुख्याने विराआस युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष  मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुधाताई पावडे, जय विदर्भ पार्टी महासचिव विष्णुपंत आष्टीकर , सहसचिव गुलाबराव जी धांडे , नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद  भोसले, कळमेश्वर तालुका अध्यक्ष युवा आघाडी संजय चौधरी,  छायाताई सुताने,  कुंदाताई वाघमारे, जगदीश पाटील  प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post