अडेगाव येथे ११ मे रोजी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे संध्या.७ वाजता जाहीर व्याख्यान
विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव
अडेगाव येथे ११ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा परिषद शाळा अडेगाव येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .सदर उपक्रमाचे आयोजन युवानेते मंगेश पाचभाई यांच्या वतीने करण्यात आले आहे .
या जाहीर व्याख्यानाचा लाभ समस्त सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , महिला बचत गट व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आहावन आयोजकांनी केले आहेत .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक गिरिधर काळे तर उदघाट्क संजय दरेकर व जयंत व्यास , विशेष पाहुणे म्हणून गजानन मुंडकर ,अजित जाधव ,अविनाश पोइंनकर, सीमा लालसरे , अशोक उरकुडे , सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून विशाल ठाकरे , साईनाथ माणुसमारे , विनोद धोटे ,मीना आर्मूरवार , दुर्गा पिंपळकर , संदीप गोडे , मारुती येडमे , शुभांगी लोंढे , डॉ. पारशिवे , नेताजी पारखी गुरुजी बंडू पारखी , सुशील ओझा , सतीश नाकले यांची विशेष उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंगेश पाचभाई , संतोष पारखी,संजय आत्राम ,गणेश पेटकर,दिनेश जिवतोडे ,विजय लालसरे ,विलास देठे , प्रनल गोंडे , अनिल आवारी ,गिरिधर राऊत ,संतोष शेरकी ,खुशाल पारखी ,निखिल देठे ,प्रदीप खोबरे , संदीप झाडे मित्र परिवार यांनी केले आहे.

