भाजपाचे किंगमेकर डाॅ.अशोकराव सुर्यवंशी पाटील हे 12 मे रोजी किनवट दौऱ्यावर.
विदर्भ माझा न्युज 24 - माहुर - विषेश जिल्हा प्रतिनिधी राजिक शेख
म्हणतात ना ''नेकी कर और दरीया मे डाल'' अगदी तशीच प्रचीती मागील काही वर्षात किनवट माहुर तालुक्यातील भाजप च्या बाबतीत घडलेली दिसुन येतेय.मागील कित्येक दशकात मरगळीस आलेल्या भाजपाला एका नवीन चेहऱ्याने नवसंजीवनीच दिली आणि एखाद-दुसरा सदस्य असलेल्या भाजपाची किनवटच्या नगरपरीषदेसह पंचायत समीतीवरही सत्ता आली आणि त्यांच्या कार्याची दखल थेट दिल्लीने घेतली....होय तो चेहरा म्हणजेच भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य, प्रसीद्ध उद्योगपती डाॅ.अशोक पाटील सुर्यवंशी.स्वताचा वेळ,पैसा आणि मेहनत खर्च करुन,दिवसरात्र एक करत अख्खा मतदार संघ पिंजुन काढत सगळीकडे भाजपमय वातावरण निर्माण केले आणि त्याचेच फळ किनवट माहुरवर 15 वर्ष वर्चस्व असलेले दिग्गज व बलाढ्य नेते लाखोंची वोटबँक असले माजि आमदार प्रदीपजी नाईक पराभुत झाले व भिमरावजी केराम विधानसभेत गेले.
बऱ्याच काळानंतर सुर्यवंशी पाटील हे दि.12 मे 2022 गुरुवारी किनवट माहुर दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे किनवट माहुर तालुक्यातील हजारों कार्यकर्त्यांमधे जनु नवीन उर्जाच संचारलीय असेही चित्र पाहायला मिळत आहे.येणारे दिवस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आहेत अनेक नवे-जुने इच्छुक गुडघ्याला बाशींग बांधुन बसलेत अशातच सुर्यवंशी पाटलांचा दाैरा हा मागील कालावधीच्या आढाव्यासह ईच्छुकांची चाचपणी व निवडणुकीच्या बाबतीतील रणनितीसाठी असावा असा कायास विरोधकांसह कार्यकर्त्यामधे बांधला जात आहे.त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु असुन किनवट माहुर तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांसह त्यांच्या हजारो चाहत्यांनी 12 मे रोजी उपस्थीत राहण्याचे आवाहन भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे,मा.भाजपा तालुका सरचिटणीस हाैसाजी काकडे पाटील व कािसान आघाडी तालुका सरचिटणीस मनोहर ताटे पाटील यांनी केले आहे.
