Top News

भिषन अपघाताने नागभीड शहर हादर्ले.......

भिषन अपघाताने नागभीड शहर हादर्ले.......


दोघांचा जागीच मृत्यु....एक गंभीर जखमी.......


भावाच लग्न आणि भिषण अपघात....गावात शोककळा.....



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 


नागभीड तालुक्यात चिखल परसोडी येथे आज सायंकाळची नातेवाईकांच्या लग्नाची लगबग होती मात्र अश्यातच गावात शोककळा पसरली,एका अपघाताने गावात भयाण शांतता पसरली.

नागभीड वरुन ब्रम्हपुरी कडे जाणार्या एम.एच.40बि.जी.5441 या क्रमांकाच्या दुचाकी चा नागभीड रेल्वे फाटक जवळ जोरदार अपघात झाला,

अपघातात चिखली परसोडी येथील बोकडे कुटुंबातील भुषण शामराव बोकडे (वय २१),पवन विनोद बोकडे (वय १५), यांचा जागीच मृत्यु झाला तर गीरीश सुधाकर बोकडे (वय १६) हा गंभीर जखमी झाला.

अपघातात जखमी झालेल्या गीरीशला नागभीड येथील ग्रामीण रुग्नालयात प्राथमीक उपचार करून ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. 

मृत भूषण हा नागभीड येथील कीराणा दुकानात काम करायचा मात्र आज चुलत भावाचे लग्न असल्याने तो कामावर गेला नाही,पण आपल्या चुलत भावंडासहीत कामानिमीत्य तो नागभीड येथे जात असताना टिप्पर ने त्यांना जोरदार धडक दिल्ली.

सदर अपघातात २ भावंडांचा जागीच मृत्यु झाला तर १ गंभीर जखमी झाला.

दोन्ही मृतकाचे मृत्युदेह ग्रामीन रूग्नालय नागभीड येथे उत्तरीय तपासनी साठी आणले आहे.

मृतक आणी जखमी हे सर्वसामान्य कुटुंबातील असुन आई वडील हे मजुरीचे काम करतात मृतक भुषण बोकडे याला आई वडील एक भाऊ व एक बहीन आहे तर पवन‌ बोकडे याला आई वडील व एक बहीन आहे, या घटनेने बोकडे कुटुंबीयांनवर आणी गावकर्यांनवर फार मोठे दु:ख कोसळले आहे. सदर घटनेचा तपास नागभीड चे पोलिस निरीक्षक राजु मेंढे याच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Previous Post Next Post