Top News

बल्लारशाह राष्ट्रवादीला धक्का...

बल्लारशाह राष्ट्रवादीला धक्का...राष्ट्रवादीच्या श्रीमती लीना कुसराम यांचा सहकार्यांनसह भाजप मध्ये प्रवेश.....





विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 


माजी,अर्थ नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी श्रीमती.लीना कुसराम यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात चंदनसींह चंदेल, माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला.

याप्रसंगी संगठन प्रभारी राम लाखियां भाजपाचे शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, महामंत्री मनीष पांडे,हे उपस्थित होते.

श्रीमती लीनाताई कुसराम यांच्यासह श्रीमती.सुमनबाई मेश्राम,श्रीमती. वंदना मडावी,अविनाश तुमराम,संदेश कोडापे, ओम मडावी यांनी देखील प्रवेश घेतला,याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना चंदनसींह यांनी सांगितले की सुधीर मुनगंटीवार च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतलेल्या सर्वांचे आभार मानतो व त्यांचे पक्षात स्वागत करतो.

भारतीय जनता पार्टीची विचारसरणी ही शेवटच्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यास्तव नेहमी मार्गस्थ असल्या कारणांनी भारतीय जनता पार्टी कडे जनतेचा कल नेहमीच वाढत असतो त्याचाच हा एक भाग असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी जिला अध्यक्ष  धनराज कोवे, हरीश गेडाम, महामंत्री अरविंद, मडावी गंगाधर, कुटावार, दिलीप पेंदोर,अविनाश तुमराम,श्रीमती.तानाबाई मेश्राम, भास्कर पेंदोर,श्रीमती.उमा नेताम,दिगांबर नैताम,श्रीमती.उषा आत्राम, श्रीमती.पूजा कुळमेथे, श्रीमती.कविता भांडेकर,श्रीमती.अरुणा तोडसाम,श्रीमती.निर्मला कुमरे,मनोज सुरपाम,ओम मेश्राम,सुनील सिडाम,कुणाल मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

Previous Post Next Post