Top News

बल्लारशाह पोलिसांनी विविध ठीकानी चोरी करणार्या चोराच्या मुसक्या आवळल्या.......

बल्लारशाह पोलिसांनी विविध ठीकानी चोरी करणार्या  चोराच्या मुसक्या आवळल्या.......


जिल्हात विविध तालुक्या मध्ये चोरी करणारा चोर अखेर बल्लारशाह पोलिसांच्या तावडीत......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 


बल्लारशाह पोलीस ठाणे अप क्र. 469/2022 भा.द.वि. कलम 379 या गुन्ह्यांचे तपास करत असताना डी.बी पथकामार्फत घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांचे कडून माहिती प्राप्त करुन त्या प्रमाणे आरोपीला गडचांदुर येथून ताब्यात घेतले व सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्यावर आरोपी नितीन नात्तुजी मारबते यास दि.05/05/2022 रोजी अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्याचेकडे कौशल्य पुर्ण तपास करुन बल्लारशाह पोलिस स्टेशन येथिल 2 मोटर सायकल (दुचाकी वाहन) मुल पोलिस स्टेशन 1 मोटर सायकल (दुचाकी वाहन) व रामनगर पोलिस स्टेशन येथिल 1 मोटर सायकल (दुचाकी वाहन) असे एकुण 4 मोटर सायकल (दुचाकी वाहन) चोरीचे गुन्हे व गडचांदूर पोलिस स्टेशन येथिल 1 चोरीचा गून्हा असे एकूण 5 गून्हे उघडकीस आणले आहेत. 

त्यामध्ये  खालीलप्रमाणे माल जप्त  करण्यात आला आहे.

1)  50,000 /- रु. की बजाज 220 पल्सर. 

2)  50,000  /-  रु.की.ची होंडा डीवो

3)  50,000/- रु.की.ची TVS Star 

4)  10,000/- रु.की ची बजाज डिस्कवर

 असा एकूण 1,60,000/- रु.कि च्या एकुण चार मोटर सायकल मिळुन जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई पोलीस नीरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस नीरीक्षक विकास गायकवाड, पो. हवा रानविजय ठाकुर, आनंद परचाके, सुधाकर वरघणे, नापोशी शरद कुडे, सत्यवण कोटणाके, राकेश बंजारीवाले, संतोष दंडेवार, पोशी श्रीनिवास वाबिटकर, शेकर मथांकर, दिलीप अदे यांनी केली आहे.

Previous Post Next Post