Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी  



विदर्भ माझा न्युज 24 - मुल



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मुल शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुमित सुरेशराव समर्थ, विधानसभा अध्यक्ष बल्लारपूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसन वासाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल , भास्कर खोब्रागडे शहर अध्यक्ष मुल, ज्ञानेश्वर वाघमारे तालुका महासचिव, प्रभाकर धोटे, हेमंत सुपणार ,शहर महिला कार्याध्यक्ष सौ. भाग्यश्री तागडे उपस्थित होते.

 सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुमित समर्थ यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महामानव डॉ बाबासाहेब  आंबेडकर ह्यांचे  विचाराचे वाचन फक्त भारत देशात नव्हे तर संपूर्ण विश्वात वाचन चालू आहे ! बाबासाहेबांचे विचाराचे वाचन करणे ही काळाची गरज आहे !

 महामानवाचे विचार घरा घरा पर्यंत पोचवा असे मार्गदर्शन सुमित समर्थ यांनी केले.सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे  पदाधीकारी दुष्यांत महाडोळे, संदीप तेलंग, प्रदिप देशमुख, सतीश गुरूनुले, अक्षय वाकडे, राहुल बारसागडे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

Previous Post Next Post