Top News

शरद पवार यांनी विचारपूर्वक निर्णय न घेतल्यामुळे त्यांच्या घरावर आक्रमण झाले याचा त्यांनी विचार करावा - अरुण केदार,अध्यक्ष,जय विदर्भ पार्टी

शरद पवार यांनी विचारपूर्वक निर्णय न घेतल्यामुळे त्यांच्या घरावर आक्रमण झाले याचा त्यांनी विचार करावा - अरुण केदार,अध्यक्ष,जय विदर्भ पार्टी




विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर



आदरणीय राष्ट्रवादी पार्टी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एस.टी. कर्मचाऱ्यांद्वारे जुते - चपलांनी मारा करण्यात आला याचा जय विदर्भ पार्टी तर्फे असा तर्क काढलेला आहे की मा. शरद पवार यांच्या भारताच्या कृषिमंत्रीच्या पदावर असताना त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात त्यातल्या त्यात विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या त्याला त्यांची विरोधक नीती जिम्मेदार होती, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नागपूर येथे गोवारी हत्याकांड झाले, संपूर्ण आंदोलन पाहूनही पवार साहेब मुंबईला रवाना झाले. कित्येक अश्या दुर्दैवी घटनांचा त्यांनी कधीही विचार केला नाही. वेगळा विदर्भ झाला पाहिजे या आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन चेतावणी चे भाषण देतात यात त्यांना असे वाटत नाही का कुठे तरी आपले चुकते.  एस.टी.कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जो ५ महिन्यापासून अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कर्ज घेऊन घर चालवायची पाळी आली असून, दीडशे च्या अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. तरी सुद्धा सर्व राजकीय पक्ष मुंग गिळून बसले आहे. त्यांच्या मागणीवर चर्चा सुद्धा करायला तयार नाही. अश्या परिस्थितीत एस. टी. कर्मचाऱ्यांना आलेला राग व त्यांनी केलेला हमला याचे चिंतन व मनन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले पाहिजे. 

 मोठा दृष्टिकोन ठेऊन एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार केला पाहिजे व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, अन्यथा ही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल व त्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्र भर उमटेल, नाइलाजास्त सत्तेच्या बाहेर रहावे लागेल. तसेच शरद पवारांनी बदल्याचे राजकारण सोडून द्यावे असा सल्ला जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, महासचिव विष्णूपंत आष्टीकर, उपाध्यक्ष रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, कोषाध्यक्ष सुयोग निलदावार, सहसचिव गुलाबराव धांडे, कार्यकारणी सदस्य अरुण मुनघाटे, कृष्णाजी भोंगाडे, सुदाम राठोड, मारोतराव बोथले, पॉलिट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते, अरविंद भोसले, सुनीता येरणे  यांनी दिला.

Previous Post Next Post