Top News

भारनियमन त्वरित संपवा व वीज दरवाढ मागे घ्या - जय विदर्भ पार्टी

भारनियमन त्वरित संपवा व वीज दरवाढ मागे घ्या - जय विदर्भ पार्टी

 




 विदर्भ माझा न्युज 24 - नागपुर



मागील आठ - दहा दिवसापासून सतत भारनियमनामुळे विदर्भातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात त्रास होत आहे.  त्यांच्या भविष्यावर त्याचा परिणाम जाणवून येत आहे.  गर्मीचा उकाळा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे.  ४२ डिग्री च्या वर तापमानात वाढ झाली असून सर्वांनाच कुलर पंख्याची आवश्यकता भासत आहे. जनतेचे जगने असहाय झाले आहे, जनतेला भारनियमन च्या त्रासापासून मुक्ती मिळाली पाहिजे याकरता आज दि:१३/०४/२०२२ ला जय विदर्भ पार्टी च्या वतीने ऊर्जामंत्रीच्या नावे मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. नागपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. #jvp 



शेतकऱ्यांचे पीक कापणीला आले असून अश्या परिस्थितीत त्यांना विजेची आवश्यकता मोठया प्रमाणात असते. भारनियमयामुळे शेतीत सिंचन अपुरे होत असल्याने पाण्याअभावी पीक करपू लागले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत आला आहे.  अश्याच कारणामुळे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सोमलवाडा येथे २३ वर्षीय कृष्णा शालिकराम अतकरी या तरुण शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन १० एप्रिल २०२२ रविवार ला सकाळी ६ वाजता शेतात आत्महत्या केली याला कारणीभूत भारनियमन असून विदर्भातील गावागावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पंपाने पाणी न भरल्या गेल्यामुळे नळाला पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आता विदर्भातील जनतेवर तहान भुकेनी तडपून मारण्याची पाळी येत आहे.  महाराष्ट्रात राहून विदर्भातील जनतेचे जगणे अशक्य आहे. यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून आधीच विदर्भातील कुटुंबांचे उत्पन्न पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी असून या महिन्यात प्रत्येक  इलेकट्रीक बिलावर अधिकची अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून हजारोचे देयके लागून आलेले आहेत अश्यात चहूकडून विदर्भातील जनतेवर अन्याय करणे सुरूच आहे. म्हणून अधिकची सुरक्षा ठेव त्वरित मागे घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सुचवल्या नुसार वीज वितरण कंपनी द्वारा १३ टक्के विजेच्या दरात वाढ प्रस्तावित आहे, हे विदर्भाच्या जनतेला मान्य नाही.  विदर्भ विजेचा मोठा उत्पादक प्रदेश आहे. येथील वीज कारखान्यान मध्ये ६३०० मेगावॅट तयार होते, त्याकरिता लागणारे संसाधन सुद्धा विदर्भातीलच वापरल्या जाते, विदर्भातील वीज कारखान्यान मध्ये १ युनिट वीज तयार करायला सरासरी २ रु.५० पै. खर्च येतो त्यावर विविध भार-अधिभार लावल्यामुळे घरगुती वीजग्राहकांना कमीत कमी  ७ रु. ५० पै. च्या दराने विजेकरता पैसे मोजावे लागत आहे.  विदर्भाच्या वीज उत्पादनाच्या तुलनेत मागणी फक्त २२०० मेगावॅट असून ४१०० मेगावॅट वीज पश्चिम महाराष्ट्रा कडे पळवली जाते, मग विदर्भाच्या जनतेने भारनियमनाचा त्रास का सहन करावा ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

#jvp 

जय विदर्भ पार्टी च्या वतीने निवेदन सादर करताना सांगितले की अघोषित भारनियमन , वाढीव वीज बिल दरवाढ व अतिरिक्त सुरक्षा ठेव हे विदर्भातील जनतेला मान्य नाही म्हणून आपण विदर्भात शहरी ग्रामीण भागातील भारनियमन त्वरित संपवावे तसेच प्रस्तावित १३ टक्के विज दरवाढ मागे घ्यावी अन्यथा जय विदर्भ पार्टी आपल्या  ऊर्जामंत्रालया विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अशी चेतावणी देण्यात आली.यावेळी निवेदन सादर करताना जय विदर्भ पार्टी महासचिव विष्णूपंत आष्टीकर, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, सहसचिव गुलाबराव धांडे, पॉलिट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते, मध्य नागपूर अध्यक्ष नरेश निमजे, दक्षिण नागपूर अध्यक्ष राजेंद्र सतई, दक्षिण -पश्चिम अध्यक्ष अशोक पाटील, पूर्व नागपूर अध्यक्ष नितीन अवस्थी, प्रशांत जयकुमार, संतोष खोडे, प्रशांत तागडे उपस्थित होते.  #vidarbhmazanews24

Previous Post Next Post