चंद्रपुर शहरात बुरखाधारी व्यक्तीने फिल्मी स्टाईल ने केला गोळीबार
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपुर)
चंद्रपुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमधे एका बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार करून एका व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सुत्रांनकळुण मिळालेल्या माहीती नुसार सविस्तर वृत्त असे आहे की चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथील एका हॉटेल मधे आज्ञात बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला ह्यात अंदेवार नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार होताच सदर व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शेजारीच असलेल्या M.I. मोबाईल शोरूम मधे दडून बसला. दरम्यान आरोपी पळुन जाण्यास यशस्वी ठरला असुन ह्या प्रकरणाचे तार
बल्लारशाह शहराशी जोडल्या गेले असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस टीम मोक्यावर दाखल झाली असुन पोलीस कारवाई सुरू आहे.


