वेगळ्या विदर्भासाठी वामनराव चटप यांचा एल्गार “विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता”...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विराआंस चे online सदस्य नोंदनी अभीयान सुरु.....
जानुणघ्या कसे होता येईल स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीत सहभाग.....
"विदर्भवादी नेत्यांनी धुंदी घाटात जाऊन स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. यावेळी विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, असा इशारा माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी केंद्र सरकारला दिला."
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
वेगळ्या विदर्भसाठीची चळवळ पुन्हा तीव्र झाली असून विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहेत. लोकनायक बापूजी अणे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून पुसद तालुक्यातील धुंदी घाटात 10 जुलै 1930 रोजी वन सत्याग्रह केला. याच पार्श्वभूमीवर आता विदर्भवादी नेत्यांनी धुंदी घाटात जाऊन स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. यावेळी विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, असा इशारा माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी केंद्र सरकारला दिला.
आता स्वतंत्र विदर्भसाठी चळवळ
वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी त्यांची चळवळ पुन्हा एकदा तीव्र केली आहे. येणाऱ्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच क्रांती दिनी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. तशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी दिली आहे.
स्वतंत्र विदर्भराज्याच्या चळवळी साठी सभासद नोंदणी सुरु...
स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवीण्या करीता आता ९ आॅगस्ट क्रांती दिना पासुन नागपूरात बेमुद्दत ठीय्या आंदोलन करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभुमीवर समितीचे अध्यक्ष ऍड. वामनराव चटप,मुख्यसंयोजक राम नेवले,महीला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे,युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुलकर, हे संपुर्ण विदर्भ दौरा करीत आहेत,विदर्भातील प्रतेक तालूका,शहर,जिल्हाच्या ठीकानी बैठका घेऊन चळवळीतील पदाधीकार्यांना व सदस्यांना मार्गदर्शन व सुचना देत आहेत, त्याच अनुशंगाने संपुर्ण विदर्भात सदस्य नोंणी अभियान देखील चालवीला जात आहे,
स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवीण्या साठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सदस्य नोंदणी अभियान राबवीत आहे, विदर्भातील तरुन,विद्यार्थी,युवा,युवती,शेतकरी,बेरोजगारांनी आंदोलनात सहभागी होऊन विदर्भ राज्य स्वतंत्र करण्यासाठी www.jaividharbha.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि ONLINE सदस्य नोंदणी बटण वर क्लीक करून नोंदणी करा. आणी आंदोलन आणखी तिव्र करा.
