Top News

Bandu_Gaurkar_demands_to_start_vaccination_center_at_Tohogaon

 तोहोगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची बंडू गौरकार यांची मागणी..



विदर्भ माझा न्युज 24 - तोहोगाव 

कोरोनाची तिसरी लाट  येण्याची शक्यता आहे तर कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वांना लसीकरण करणे आवश्यक आहे. म्हणून  18 ते 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करणे आवश्यक आहे. परंतु  प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे लसीकरण केन्द्र नसल्यामुळे नागरिकांचे लसीकरण होते नाही आहे. तोहागाव वासीयांना इतरत्र जाऊन कोरोना लस घ्यावी लागते आणि त्रास होतो.

 त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे कोरोना लस लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी बंडू मधुकर गौरकार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्याकडे निवेदन द्वारे केली. यावेळी  सूनील उरकुडे क्रुशि सभापति जिल्हा परिषद चंद्रपुर, राजू गायकवाड़ जिल्हा परिषद सभापति व धनराज कोवे हे उपस्थित होते.

Previous Post Next Post