ऐतीहासीक बल्लारशाह गडावर एकाचा संशयास्पद मृत्यु.
नैसर्गीक मृत्यु की घातपात चर्चांणा उधान.
( विदर्भ माझा न्युज 24 )बल्लारशाह :- बल्लारशाह शहरातील वस्ती विभागात ऐतिहासिक किल्ल्यात आज दुपारी 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास एक इसम मृतावस्थेत आढळून आला, विशेष बाब म्हणजे मृतकाच्या डोक्यावर मार असल्याचे दिसून येत आले. या विषयीच्या सविस्तर वृत्ता नुसार बल्लारशाह शहरातील श्रीराम वार्ड, सिंधी भट्टी च्या बाजूला राहत असलेले नहीम खान गफ्फार खाण पठाण वय - 42 हे आज सकाळी 7 :00 वाजताच्या दरम्यान आपल्या घरातील कुणालाही काहीही माहिती न देता निघून गेले होते.
या मृत्यू वर अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे सदर व्यक्ती किल्ल्यात आला कसा?
सदर घटना दिवसाला घडली त्यामुळे कुणालाही कसे कळले नाही ?
सदर व्यक्तीचा मृत्यू हा किल्ल्यातच झाला की बाहेर कुठे ई प्रश्न अनुत्तरित आहे तसेच कुटुंबियांच्या माहितीनुसार सदर मृत्यू हा नैसर्गिक नसून संशय व्यक्त करण्यात येत आहे, मृतकाच्या डोक्याला मार असून गळ्याच्या सभोवताल काही अंशी डाग असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माहितीतून कळत आहे, सदर घटनेचा तपास बल्लारशाह पोलीस करीत असून सदर मृत्यू नेमका नैसर्गिक की हत्या या बाबीचा उलगडा लवकरच बल्लारशाह पोलीस करतीलच.


