दिलासादायक : नांदेड जिल्ह्यातील लॉकडॉऊनमध्ये ५ एप्रिलपासून नियम व अटीसह शिथिलता.
" नाईट लॉकडाऊन" मात्र कायम
जिल्हधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश निर्गमित
(विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतीनीधी),राजिक शेख,माहुर :- नांदेड जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडावूनची घोषणा केली होती. यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेशीत करण्यात आले होते. मात्र 5 एप्रिलपासून जरी जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविला असला तरी तो केवळ रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान लागू असणार आहे. तर सकाळी सात ते रात्री आठ या दरम्यान आता आपली दुकान, आस्थापना चालू ठेवता येणार आहेत.
लॉकडॉऊन बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचे आवाहन!
राज्यशासनाने लॉकडाऊन बाबत नव्याने आदेश काढले असून दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान सायंकाळी 8 :00 ते सकाळी 7 :00 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात ही दिनांक 5 ते 15 एप्रिल पर्यंत कडक लॉकडॉऊन कायम असणार आहे अशी अफवा केली जात आहे. कृपया यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी केले आहे.
जिल्हादंडाधिकारी यांचे नवे आदेश
ज्या आरती सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक 14 मार्च 2020 अन्वये कोरोना विषाण (covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि त्या बाबतचे नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात covid-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणत्याही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.
ज्याअर्थी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील No. DMU/2020/Cr. 92/DisM-1 दिनांक 29/06/2020 रोजीच्या आदेशामध्ये त्या जिल्ह्यातील परिस्थितीप्रमाणे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढण्याबाबत सर्व अधिकार देण्यात आले आहेत.
आणि ज्याअर्थी या कार्यालयाचे संदर्भ क्र.5 वरील दिनांक 21/03/2021 आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात दिनांक 4 एप्रिल 2019 च्या 24:00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू आहेत.
त्याअर्थी राज्य शासनाकडून संदर्भ क्र.4 वरील उक्त आदेशात दिलेल्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 05 एप्रिल 2021 च्या 00.01 मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची मुदत दिनांक 15 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 12:00 वाजता पर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत covid-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 04 एप्रिल 2021 च्या 24 राजे नंतर म्हणजेच दिनांक 05 एप्रिल 2021 च्या 00:01 वाजेपासून खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत.
अ)कोविड -19 संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना
1) मूक पट्टी/मास्कचा वापर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, त्याचप्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक असेल.
2) सामाजिक अंतर राखणे - नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक असेल व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक असेल आणि अशा आस्थापनांमध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक/ व्यक्ती असणार नाहीत.
3) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध - सार्वजनिक ठोकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध त्या-त्या संबंधित प्राधिकरणाने कायदे व नियम या द्वारे निश्चित केलेल्या दंडाची आकारणी करण्यात यावी.
4) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी आणि खाण्यास पिण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
5) घरातून काम करणे खाजगी/शासकीय/निमशासकीय कार्यालये आहेत त्याचप्रमाणे व्यापारी / औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेप्रमाणे घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी. कार्यालय कामाचे ठिकाणी दुकाने बाजार तसेच औद्योगिक आस्थापनांच्या कामाच्या वेळामध्ये अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची गर्दी होणार नाही अशा पद्धतीने विभागणी करावी
6) सर्व आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी/ग्राहक यांच्यासाठी शरीराचे तापमान तपासणे हात धुणे आणि सॅनिटायझर ची सुविधा सर्व, प्रवेश बहिर्गमन दारात व सामुदायिक जागांच्या ठिकाणी ठेवावे.
7) सर्व आस्थापनामधील कामाची जागा, सामुदायिक वापराचे ठिकाणे त्याच प्रमाणे व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क होयेईल अशी ठिकाणे त्याच प्रमाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यायावीत.
8) सर्व प्रकारच्या अस्थापना मधील व्यवस्थापन तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल दोन कामाच्या पाळ्यांमध्ये अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा भिन्न असतील याची दक्षता घ्यावी.
प्रतिबंधात्मक उपाय योजना -
1) कंटेनमेंट झोन - प्रतिबंधित क्षेत्र
▪️ स्थानिक प्रशासनाने घोषित केलेली प्रतिबंधित क्षेत्रे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.
▪️ केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेनमेंट झोन तयार करणे विषयी दिलेल्या सर्व सूचना या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील
▪️ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सकारात्मक चाचणी आलेल्या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करणे त्यांचा मागोवा घेणे त्यांची ओळख पटविणे त्यांच्या अलगीकरण करणे आणि त्यांचा 14 दिवसापर्यंत पाठपुरावा करणे( सकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 80% व्यक्तींना 72 तासांमध्ये शोधून काढणे)
2) नांदेड जिल्ह्यात दिनांक 27 मार्च 2019 च्या मध्यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंधित आदेशानुसार दिनांक 5 एप्रिल 2021 च्या 00.01 मध्यरात्रीपासून सायंकाळी 08.00 ते सकाळी 07.00 वाजता पर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव असेल. त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती रक्कम रु.1000/- रुपये (प्रति व्यक्ती) दंडास पात्र राहतील
4) कोणत्याही व्यक्ती मास्क परिधान केलेली आढळल्यास रक्कम रु.500/- दंडास पात्र राहील सार्वजनिक ठिकाणी कोणतीही व्यक्ती थुंकताना आढळल्यास रक्कम रु. 1000/- दंडास पात्र राहील
5) नांदेड जिल्ह्यात दिनांक 27 मार्च 2021 च्या मध्यरात्रीपासून असणाऱ्या प्रतिबंधक आदेशानुसार दिनांक 5 एप्रिल 2021 च्या 00.01 मध्यरात्री पासून सायंकाळी 8:00 वा. ते सकाळी 07.00 वाजता पर्यंत सर्व सिनेमा हॉल ( सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्सस) मॉल्स सभागृहे आणि रेस्टॉरंट बंद राहतील. तथापि सदर कालावधीत रेस्टॉरंट मधून होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा देण्याची परवानगी असेल
6) 'No Mask - No Entry / मास्क नाही प्रवेश नाही हा फलक सर्व खाजगी शासकीय-निमशासकीय कार्यालये उद्योग दुकाने बाजार इत्यादी ठिकाणी लावणे व त्याचे पालन करणे अशा आस्थापना / कार्यालयाचे प्रमुखांवर बंधनकारक असेल ज्या आस्थापना कार्यालयाचे सदरील उल्लंघन करतील त्या आस्थापनांचे/ कार्यालयांचे प्रमुख वैयक्तिक रित्या त्याचप्रमाणे अशा अस्थापना / कार्यालये संस्था म्हणून एकावेळी रक्कम रु 1000/- दंडास पात्र राहतील. सदर आदेशाचा भंग केल्यास तसेच यापूर्वीच्या देशातील अटी व शर्तींचा भंग केल्यास., संबंधित सिनेमागृहे सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स हॉटेल्स रेस्टॉरंटस ही कोव्हीड -19 विषाणू संसर्ग केंद्रसरकारने आपत्ती म्हणून सुचित केले असे तोपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित अस्थापना मालकी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करण्यास पात्र राहतील.
7) कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक कार्यक्रम सभा मोर्चे मिरवणुका संमेलने तसेच यात्रा उत्सव उरूस इत्यादींचे आयोजन करण्यास परवानगी असणार नाही. सभागृह नाट्यगृहे देखील सदर कार्यक्रम मेळावे सभा यांचे आयोजन करण्यास वापरू नयेत सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधित कार्यक्रमाचे आयोजक जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करण्यास तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृहे इतर ठिकाणे ही covid-19 विषाणू संसर्ग केंद्रसरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद केले जातील.
8) विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त पन्नास नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सदर आदेशाचा भंग केल्यास संबंधित कार्यक्रमाचे ठिकाण व्हाल मालक हे आपत्ती व्यवस्थापनात कायद्याअंतर्गत दंड वसूल करण्यास पात्र राहतील तसेच संबंधित ठिकाणी हॉल ही covid-19 विषाणू संसर्ग केंद्रसरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद केले जातील.
9) अंत्यविधी अंतयात्रा इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास फक्त वीस नागरिकांना परवानगी असेल स्थानिक प्राधिकरण यांनी अटीचे पालन केले जात नसले बाबत खात्री करणे.
10) ग्रह विलगीकरण खालील प्रतिबंधित आधीन राहून परवानगी असेल.
▪️ गृह हलगी करून झालेल्या नागरिक रुग्णां विषयी माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे तसेच ग्रह अलगीकरण व्यक्तीही कोणत्याही वैद्यकीय व्यवसायिकच्या (डॉक्टर) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनाने देणे बंधनकारक असेल.
▪️ covid-19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यंत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल जेणेकरून त्या ठिकाणी covid-19 रुग्ण असलेच्या माहिती नागरिकांना होईल.
▪️ covid-19+ ve मुलांच्या हातावर गृह अलगीकरण (Hom Quarantine)असा शिक्का मारणे.
▪️ सदर covid-19 रुग्ण ग्रह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तींनी ही कमीतकमी संपर्क ठेवावा तसेच मास्क परिधान केल्याशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही याविषयी दक्षता घेण्यात यावी.
▪️ग्रहणी प्रकरणाशी कोणताही प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर covid-19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेल्या नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या अंड केअर सेंटर मध्ये (CCC) मध्ये स्थलांतरित केले जाईल.
11) सर्व खाजगी कार्यालय आस्थापना (आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या अस्थापना वगळता) ही 50% क्षमतेच्या अधीन राहून सुरू राहतील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालय प्रमुखांनी कर्मचारी उपस्थितीबाबत covid-19 प्रादुर्भाव व्यवस्थापनाच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा. सर्व उत्पादन करणाऱ्या स्थापना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. परंतु अशा स्थापना आणि प्रत्यक्ष उत्पादनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्ये सामाजिक अंतर राखले जाण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे उपस्थिती कमी ठेवण्याबाबत सुचित करण्यात येत आहे. वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या घटकातील कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक आंतर राखण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाने मान्यता दिल्याप्रमाणे अशा घटकांना कामाच्या पाळ्या वाढवण्याची मुभा असेल. अशी उत्पादन क्षेत्रे खालील बंधनाचे पालन करून सुरू राहतील
▪️ मास्क परिधान केल्या शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. (No Mask - No Entry)
▪️ सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.
▪️ प्रवेशद्वार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावीत.
▪️ सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे जेणेकरून सर्व अभ्यांगाता बाबत मार्ग परिधान केले जाईल सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.
▪️ या आदेशाचा उल्लंघन करणारे संबंधित घटक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करण्यास तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील तसेच संबधित असता पण नाही covid-19 विषाणू संसर्ग केंद्र सरकारने अपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद केले जातील
12) शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी वगळून इतर अभ्यागतांना सातवीच्या कामाशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी असणार नाही ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेले आहे त्यांच्या बाबतीत विभाग/ कार्यालय प्रमुख यांनी विशेष निर्गमित करण्यात यावे.
13) धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेसे सामाजिक आंतर रोखले जाण्याच्या दृष्टीकोणातून सदर तासाला किती अभ्यागतांना प्रवेश देण्यात येईल या संख्येची निश्चिती करून प्रसिद्धी करणे. भाविक तसेच अपंगांसाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयी या पद्धतींचा वापर करणे. वरील ठिकाणी फक्त खालील जीवन दास अनुसरून प्रवेश दिले जाईल याबाबत दक्षता घेणे.
▪️ मास्क परिधान केल्या शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. (No Mask - No Entry)
▪️ सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.
▪️ प्रवेशद्वार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावीत.
▪️ सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे जेणेकरून सर्व अभ्यांगाता बाबत मार्ग परिधान केले जाईल सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.
14) ठराविक निर्बंधांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे याचे उल्लंघन होणाऱ्या व्यक्ती संबंधित सार्वजनिक परिवहन प्राधिकरण आधारे रक्कम रु.500/- दंडास पात्र राहतील
15) यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या प्रतिबंधित केलेल्या बाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील सदर चे आदेश 5 एप्रिल 2021 च्या 00.01 वाजताच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिल 2021 पर्यंत अस्तित्वात राहतील.
16) RTPCR चाचण्यांच्या प्रमाण विशेष प्रयत्न करून 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढविण्यात घ्यावेत.
17) covid-19 असणारे सकारात्मक व्यक्तींचे संपर्क शोधणे. - सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींची लवकरात लवकर अलगीकरण करणे त्यांचे संपर्क शोधून काढून त्यांच्या अलगीकरण करणे बंधनकारक असेल अशा संपर्कातील व्यक्ती किंवा covid-19 बाधित रुग्णास ग्रुप हलगी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्यास संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
18) विहित केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे यांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका, नगरपालिका प्रशासनाची असेल.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस संस्था अथवा समूह भारतीय दंड संहिता 1860, साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षक पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार नाही.
असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
