Top News

अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्या...

 अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्या...



विद्युत तार तुटल्याने ये -जा करणारे नागरिक अडचणीत..



 ( विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतीनीधी ) मनोज श्रीहरी गोरे  राजुरा  :- काल रात्रौ 10  वाजताच्या अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यातील निमनी आणि हिरापुर या गावालगत रोडवर टॉवर लाईन चे तार तुटून रस्त्यावर पडले असून ये जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास निर्माण होत आहे.पाऊस आणि हवा एवढा होता का रस्त्यावरील झाडे ,घराची छपरे उडाली आणि विजेचे खांब पडले त्यामुळे विद्युत पुरवठा सकाळ पर्यंत खंडित राहिला अंधारात रात्र काढावी लागली.


निमनी आणि हिरापुर च्या मधोमध मोठी टॉवर लाईन गेली असून त्या लाईनचा तार रोडवर पडला आहे ,त्यामुळे ये जा करणारे दुचाकी ,चारचाकी ,जनावरे ,तसेच नागरिकांना त्या लाईन चा धोका निर्माण होऊन राहिला आहे ,त्यामुळे लवकरात लवकर विद्युत तार बाजूला करण्यात यावा अशी विनंती नागरिक करीत आहे.

तरी मात्र काल‌रात्री १० वाजता दरम्यान पडलेल्या तारांना अध्यापही रसत्यांचा बाजुला केले गेले नाहीत,या मुळे नागरीकांना आज दीवस भर ये जा करण्यास नाहक त्रास सहण करावा‌ लागला,

आता 7:15 मी. आमच्या प्रतीनीधींनी काढलेले फोटो




Previous Post Next Post