Top News

१ में विदर्भासाठी काळा दिवस.

 १ में विदर्भासाठी काळा दिवस.


महाराष्ट्र दिनी विदर्भवादी पाळणार काळा दीवस. 




   (विदर्भ माझा न्युज 24) चांदा :-  विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने यंदाचा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणुन पाळण्याचे जाहीर केले आहे. या काळात कोरोना संक्रमन लक्षात घेता डोक्यावर कींवा दंडावर काळी पट्टी बांधुन किंवा घरावर काळा झेंडा लाऊन राज्य सरकार चा निषेध करण्याचे आव्हान नागरीकांना करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार चा निषेध करण्या साठी विदर्भाच्या घोषना देऊन घरावर विदर्भाचा झेंडा फळकवावा,तसेच घरूनच आंदोलन करून सोशल मिडीयावर त्याचे फोटो टाकण्याचे आव्हान‌ करण्यात आले आहे. मागील ८ वर्षा पासुन १ में हा दीवस काळा दीवस पाळुन विदर्भवादी नेते आंदोलन करीत असतात मागील वर्षीही कोरोना मुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन घरूनच केले होते. नागपुर करार करून १ मे १९६० रोजी विदर्भाला महाराष्ट्र राज्यात सामील करून घेतले. तेव्हा पासुन‌ विदर्भाचे अस्तीत्व संपले. संचन,नौकर्या प्रकल्प यात तफावत असुन करारातील ११ कलमांन पैकी एकही कलम पुर्ण कले नसल्याबद्दल विदर्भवाद्यांचा रोष आहे. वेगळे विदर्भ राज्य स्थापन करून न्याय द्यावा. अशी मागनी आहे.

सरकारने विदर्भाला वार्यावर सोडले   - राम नेवले    

 राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारने मुंबई - पुणे - नाशिक - ठाने याचा परिसराकडे कोरोनावर लक्ष केंद्रीत केले असून विदर्भाच्या जनतेला वार्यावर सोडले आहे. विदर्भात कोरोनाची दुसरी लाट भयानक येनार हे माहीत असुन ही कोनतेही नियोजन केले नाही. महाआघाडी सरकार व विरोधी पक्षांचे नेते फक्त राजकारण करीत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समीतीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला आहे.

 काय बोले ऍड. वामनराव चटप बघा विडीयो.👇👇

Previous Post Next Post