देशात व राज्यात कोरोनाच्या महामारीत निवडणूका व आयपीयल क्रिकेट टुर्नामेन्ट होऊ शकतात, पण परीक्षा का नाही. - संजय मते
(विदर्भ माझा न्युज 24) भंडारा :- दहावीच्या प्रश्न रद्द करणे म्हनजे विद्यार्थांचा विकासाचा पाया उध्वस्त करणे होय या करीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्फत व E Mail द्वारे निवेदन विशेष विनंती ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य मुख्य संयोजक/अध्यक्ष संजय मते व संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवेदन केले आहे .
राज्यपाल, मूख्यमंत्री, व शिक्षणमंत्री आपणांस विनंती आहे की, आपण दहावीच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णय घेतलेला आहे. त्यावर फेर विचार करावा. कारण परिक्षे शिवाय विद्यार्थांना उत्तीर्ण करुन हा तर शैक्षणिक भ्रष्टाचार आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा घ्याव्यात
कोरोनाच्या परीस्थितीमुळे राज्यशासाने मागील परिक्षा न घेता प्रमाणपत्र देण्यात आले. आता सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन (सीबीएससी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ (एसएससी व एसएससी बोर्ड) यासह देशातील इतर राज्यातील मंडळांनीसृध्दा दहावीच्या परिक्षा रद्द केले आहेत पंरतु इं्ता दहावी ते पदवीधर शिक्षणा पर्यतचा गुणपत्रिका यांचा विचार विद्यार्थांचा शोक्षणिक अहवालात केला जातो. दहावीच्या परीषा रद्द करणे म्हणजे विद्यार्थांचा विकासाचा पाया उध्दवस्त करण्यासारखे आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब होणारच आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाचा आधारे जाहीर केलेल्या निकालावर विद्यार्थी समाधानी असतील तर त्यांना परिक्षेची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे,
सर्वाच्च न्यायालयाने पदवी परीक्षा घेण्या संदर्भात निर्णय दिला होता तोच निर्णय विविध मंडकांनी। मान्य करत परीक्षा घेणे अपेक्षित होते. पण कोरोना परिस्थितीत आटोक्यात आल्यानंतर येत्या मे, जुन किंवा जुले महिन्यात परिक्षा घेणे शक्य आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी इयत्ता दहावीची परिक्षा घ्यावी अशी विनीती राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मूख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री, वर्षा गायकवाड यांना निवेदणात म्हंटले आहे.
