Top News

खर्या खाने पडले महागत.. राजुरा तालुक्यातील घटना.

खर्रा खाने पडले महागत.. राजुरा तालुक्यातील घटना.


 खर्रा खाणारे 6 मीत्र कोरोना पॅसिटिव्ह...




(विदर्भ माझा न्युज 24),मनोज श्रीहरी गोरे,राजुरा :-  तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाला वसाहती जवळील एका चबुतऱ्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्रा चे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणाऱ्या या सर्व मित्रांच्या हे चांगलेच अंगलट आली आहे. 


वेकोलिच्या सास्ती धोपटाला या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सीमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतऱ्यावर येऊन गप्पागोष्टी करीत टाइमपास करणे, या वसाहतीतिल सहा कामगार मित्रांचा छंद होता. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडला नाही. अर्थात या चर्चेचे वेळी काहींना खर्रा व तंबाखू खाण्याचा छंद होता.


या गोष्टी एकमेकांना आग्रह करून भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खर्रा अनुभव येत असावा. पण नुकताच यापैकी एकाला ताप आला आणी त्याने कोरोना तपासणी केली तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान झाले. यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी ठरविले. तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाला  चांदा (चंद्रपूर) ला बेड न मिळाल्याने त्याला अमरावतीला पाठविण्यात आले आहे.



Previous Post Next Post