ऐतीहासीक नगरी बल्लारशाह येथील बामनी गावातील निवासी अमोल कुमरे याची बी.एस. एफ . मध्ये निवड.
मार्गदर्शन सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र,बामनी इथे सत्कार कार्यक्रम संपन्न.
(विदर्भ माझा न्युज 24)बल्लारशाह, बामनी :- मार्गदर्शन सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र , बल्लारशाह मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी अमोल कुमरे याची बी.एस. एफ . मध्ये निवड झाल्या बद्दल सत्कार कार्यक्रमाचे आयोजित केले गेले.
कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी सुबेदार ए.एम खान सेवानिवृत्त ( संलचालक मार्गदर्शन सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र , बल्लारशाह ) होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने उमेश पाटील ( पोलीस निरीक्षक , बल्लारशाह जि .चांदा )पोलीस कर्रमचारी रवि चेरकुलवार, अमन पसंद कमेटी बल्लारशाह चे सचिव ताहेर हुसैन, सोशल मीडिया प्रमुख आफताब पठाण हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे संचालन सलमान खान अनिस अहेमद आनि त्यांच्या टिम नि केले .
बल्लारशाह तालुक्यातील बामनी एथील विद्यार्थाची बि.एस.एफ मध्ये निवड झाल्या बदल सर्व स्थरातुन अमोल कुमरे याला शुभेच्छा दिल्या जात आहे.


