सायफळ या गावातील शेतकऱ्यांची शेतात जाऊन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी घेतली मीटिंग.
कृषी अधिकाऱ्यांनी सोडवले शेतकऱ्यांचे प्रश्न
[विदर्भ माझा न्यूज़ 24 ] माहूर :- तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे व त्यांचे सहाय्यक टीमने सायफळ गावातील शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन दिले.कृषी अधिकारी गावात आल्याची माहिती लागतात शेतकऱ्यांनी व तसेच सायफळ या गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल माटवे यांनी जयराम मिश्रा यांच्या शेतात टेन्ट लावून मीटिंग घ्यायचे आयोजन केली. त्यांच्या स्वागतासाठी अध्यक्षस्थान म्हणून जयरामजी मिश्रा, यांनी स्वागत केले व तसेच रमेश पारटकर,अमोल मोठवे, अनिस शेख,निकेतन कुठे, दीपक ठाकरे, गजानन जयस्वाल, ए-आर थोरे, गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या मिटिंग मध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात आले की गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा होतो व त्याचे वर कशाप्रकारे काबू करता येईल त्याचे उपाय सांगितले व हरभरा पिकावर कशाप्रकारे फवारणी द्यायचा व खत कोणत्या प्रकारे द्यायचे कृषी पाणी कोणत्या कशाप्रकारे द्यायचा कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांना सांगितले. कापूस या पिकाला कोणत्या प्रकारचे खत द्यायचे होते व किती दिवसात द्यायचे फवारणी किती दिवसात करायची सांगितले जयराम मिश्रा यांच्या शेतील हरभऱ्याची पाहणी करतांना त्यांच्या शेतात त्यांना काही हरभऱ्याचे झाडे वाळलेले दिसून आढळली त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना जवळ करून त्यांना सांगितले की अशी झाडे का वाळतात. त्याच्यावर उपाय सांगितले सायफळ गावातील शेतकऱ्यांनी वही-पेन घेऊन ते माहिती लिहून घेतली. गावातील शेतकरी गणेश बनसोड यांनी कृषी अधिकारी साहेबांचे आभार मानले कि त्यांनी वेळेत वेळ काढून शेतकरी त्याच्या सेवेत सायफळ या गावात शेतकऱ्याचे अडचणी सोडवण्यासाठी कृषी अधिकारी स्वतःहून सहाय्यक सोबत शेतकऱ्यांच्या शेतात उपस्थित झाले.
कृषी अधिकारी साहेबांचे कृषी सहाय्यक ए आर थोरे कृषी सहाय्यक, गजानन अम्रते, विठ्ठल इटकापल्ले,कृषी सहाय्यक, करुणा दामोदर, योगिता दळवे कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक सूर्यकांता खंदारे उपस्थित होते.त्यावेळी उपस्थिती गावातील नामांकित शेतकरी रमेश पारटकर, महादेव कुठे, गजानन जयस्वाल, जयराम मिश्रा, अमोल माठवे, नितीन मिश्रा,अनिस शेख, दीपक ठाकरे, सहा गावातील शेतकरी उपस्थित होते.

