आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे बल्लारशाह येथुन शुभारंभ.
उत्तम कार्याच्या जोरावर युवामोर्चा गावागावात पोहोचवावा - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
भाजयुमो चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न.
आज बुधवार, दि. १६ डिसेंबर रोजी माजी अर्थमंत्री माननीय आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात
(विदर्भ माझा न्युज 24 मुख्यउपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह :- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात नुकताचं गठीत झालेल्या भाजयुमो जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक तथा आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय, बल्लारशाह येथे पार पडले. यावेळी, उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मी मपासुन अभिनंदन करतोय, शुभेच्छा देतोय. परंतु ह्या शुभेच्छांसोबतचं श्री. आशिषजी देवतळे यांच्या नेतृत्वात तुमच्यावर भारतीय जनता पार्टीने, पक्षातील वरिष्ठ नेते मंडळीनी जे दायित्व दिलं त्या जबाबदारीला नेहमी केंद्रस्थानी ठेवून तुम्ही कार्य कराल अशी मला आशा आहे. इथे उपस्थित सर्व तरुण, तडफदार पदाधिकाऱ्यांनी आता या क्षणापासूनचं युवा मोर्चाच्या माध्यमातुन पक्षाला गावागावात आणि गावातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्याचे ध्येय उराशी बाळगून कार्य करावे.
खरतर युवा मोर्चा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे बॅकबोन आहे. म्हणून मान. मोदीजींचे व आदरणीय सुधीरभाऊंचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी जोमाने कामाला लागावे आणि पक्षाचा विचार, तळागाळापर्यंत पोहोचवावा. असे मी आवाहन करतोय. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये सुद्धा आपण सक्रिय सहभाग नोंदवावा. असे मत श्री. देवराव भोंगळे यांनी विषद केले.
तसेच याप्रसंगी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. आशिष देवतळे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत युवामोर्चाच्या माध्यमातुन पक्षवाढीसाठी आदरणीय सुधीरभाऊ, आदरणीय हंसराज भैया व आदरणीय देवरावदादा आपल्या नेतृत्वात आम्ही सर्व यशस्वी कार्य करू. असा विश्वास व्यक्त केला.
तसेच याठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष श्री. हरीशभैय्या शर्मा, जेष्ठ नेते प्रमोदजी कडू, भाजपचे शहराध्यक्ष काशीसिंह, नवनियुक्त महामंत्री विवेक बोढे आदींनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
पार पडलेल्या या कार्यक्रमाला, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, चंद्रपूर महानगर शहर उपाध्यक्ष सुरेशजी तालेवार, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते, सचिन नरड जिल्हा उपाध्यक्ष विशाल शर्मा, सचिन डोहे यांसह सुशांत शर्मा, विशाल करंडे, जिल्हा सचिव ओम पवार, तनय देशकर, पुणेश गांडलेवार, राहुल बिसेन, विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक मोहन कलेगुरवार,प्रतीक बारसागडे सहसंयोजक, सोशल मीडिया जिल्हा संयोजक देवा बुरडकर, मंगेश मादेशवार, राहुल कावळे, सहसंयोजक सागर दुर्वे, कार्यकारिणी सदस्य बबलू गुप्ता, कौशिक काळे, अभिषेक सातोकर, रोशन मुद्दमवार, मलीलाराम राऊत, सदानंद किनेकर, घनश्याम बुरडकर श्रीकांत आंबेकर, संजय बाजपेयी, प्रकाश दोतपेल्ली, विक्की दुपारे, रामेश्वर पासवान, राजेश कैथवास, सुरज वाकुडकर आदींची उपस्थिती होती.



