Top News

"४ जानेवारीला विज व विदर्भ मार्च"

 उर्जा मंत्री नितीन राऊतच्या घराला घेराव


 कोरोना काळातील विज बील सरकारने भरावे अन्यथा मंत्र्यांना विदर्भात फीरने मुश्कील करू-विदर्भ राज्य आंदोलन समिती 



( विदर्भ माझा न्यूज़ 24 मुख्य उपसंपादक ),रोहित लोनारे,चांदा(चंद्रपुर) :-  २२ डीसेंबर २०२० ला विदर्भ राज्य आंदोलन समीची चांदा(चंद्रपुर) जिल्हा बैठक गिरीशबाबु खोब्रागडे सभाग्रुह मध्ये संपन्न झाली या बैठकीचे प्रमुख पाहुने जेष्ट विदर्भवादी,शेतकरी नेते अॅड वामनरावजी चटप साहेब,विराआस चे मुख्य संयोजक रामजी नेवले साहेब,तर अध्यक्ष स्थानी विराआस चे जिल्हा अध्यक्ष कीशोरजि पोत्तनवार,विराआस‌ युवा आघाडी  पुर्व विदर्भ अध्यक्ष कपीलजी ईदे,पुर्व विदर्भ सचीव मीतीनजी भागवत,वीराआस महीला आघाडी चांदा(चंद्रपुर) महानगर अध्यक्ष सारिकाताई उराडे हे मंचावर उपस्थीत होते, बैठकीत उपस्थीत विदर्भवाद्यांना मान्यवरांनी संबोधीत करतांना आव्हान केले विदर्भातील जनतेचे कोरोना काळातील विज बील सरकारने भरावे, २०० युनीटपर्यंत वीज फ्री करा, त्यानंतर चे वीज दर निम्मे करा, शेती पंपाला विज बीलातुन मुफ्त करा, उध्दव सरकारने अतीवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे १०हजार कोटींचे  पॅकैज जाहीर केले होते त्यात ९९९३ कोटी पश्चिम महाराष्ट्राला दिले तर फक्त ७कोटी विदर्भाच्या शेतकऱ्यांना देऊन ठाकरे सरकारने विदर्भ द्रोह व विदर्भ विरोध दाखवून दिला आहे याचा आम्ही निक्षेध करतो व विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट २५हजार रू. प्रती हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी अशी मांगणी करून व स्वतंत्र विदर्भाची निर्मीती करा या साठी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून ४ जानेवारी २०२१ ला संविधान चौक नागपुर येथून दूपारी १२:०० वा. विज व विदर्भ मार्च निघेल. ५ कि.मी हा मार्च नितीन राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घराला घेराव घालेल व त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होईल, या आंदोलनासाठी संपूर्ण विदर्भातील ११ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विजग्राहक, शेतकरी, तरूनवर्ग, महीला शामील होणार आहेत. त्यासाठी संपूर्ण विदर्भभर बैठक, सभा, सम्मैलन होत असून जनजागृती करण्यात येत आहे.

कोरोना काळात संपूर्ण उद्योग रोजगार बंद होते जनतेच्या खिश्यात पैसे नव्हते तेव्हाच सरकारने १एप्रील पासून २१ टक्के वीज दर वाढ करून सरकार विजग्राहकांकडून ६०हजार कोटी रू. ५ वर्षात वसूल करण्यात आले, तर एप्रील, मे, जून या तीन महिन्याचा लॉकडाऊन च्या काळात वीज महावितरण ने विज बीले एकत्र करून पाठविली त्यामुळे तिप्पट चौपट बिल ग्राहकांना आली व अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या विज वितरणने विजग्राहकांची लुटमार सुरू केली आहे.

रू. २.५०प्रति युनीटच्या विजेचा विदर्भातील उत्पादन खर्च असून सुध्दा आकार ५ रुपयांपासून १३ रूपयांपर्यंत विजेचे दर विजग्राहकांकडून वसूल करून सामान्यतः जनतेचे ग्राहकांचे खिसे कापण्याचा धंदा करीत आहे. तरीसुद्धा विज महावितरणाचा ५३ हजार कोटीचा तोटा आहे व हे ५३ हजार कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी ६०हजार कोटींची दरवाढ शासनाने केली आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.

राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे हॉर्स पॉवर कागदावरच वाढवून शेतकऱ्यांकडून २२हजार रू. कोटी जास्तीचे वीज बील वसुल केले असून त्यावर ८हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडून सब्सीडीची रक्कम वसूल करून ऐकून ३०हजार कोटी रू. शेतकरी व राज्य सरकारकडून जास्तीचे वसूल करून ३०हजार कोटींचा महाघोटाळा विज महावितरण कंपनीने केले आहे, हे ३०हजार कोटी रू विज महावितरणकडे आमचे जमा आहे तरी ते विजग्राहकांचे वीज कनेक्शन कसे तोडतात याचा विरोध करा.

७५टक्के विदर्भात विज उत्पादन करताना जमीन, पाणी कोळसा संपत्ती विदर्भाची लागली वरून प्रदषन ही विदर्भालाच म्हणून या विजेवर विदर्भाच्याच जनतेचा अधिकार आहे म्हणून विदर्भातील जनतेचा २०० युनीटपर्यंत विज फ्री द्या, त्यानंतरचे विज दर निम्मे करा व शेती पंपाला विज मुफ्त करा ही आमची मांगणी आहे. ३०हजार कोटी रू फिटेपर्यंत व कोरोना काळातील बिल सरकारने भरेपर्यंत विदर्भातील सर्व जनतेचे विजेचे बिल भरूच नये, विज कनेक्शन कापन्याचा विरोध करा, लाईन कापली तर जोडून घ्या या वीज व विदर्भाच्या आंदोलनात सहभागी होण्यास ४ जानेवारीला हजारोंच्या संख्येने निघा व वीज मार्च करा असे आवाहन आज विदर्भ राज्य आंदोलन‌ समीती तर्फे  चांदा(चंद्रपुर) च्या जिल्हा बैढकीत करण्यात आले आहे. या वेळी कोर कमेटी सदस्य प्रभाकर दिवे ,राजु काले, किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, चैताली बोरकुटे,जुनघरे,अनिल दिकोंडवार, शर अध्यक्ष चांदा(चंद्रपुर) , सुदाम राठोड भद्रावती तालुका अध्यक्ष, उत्तम मेश्राम,बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार, तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत, शहर सचिव संदीप केशकर,वस्ति विभाग अध्यक्ष राकेश बहुरिया, विभाग उपाध्यक्ष कुशाल बहुरिया,सचिव राजेश  बहुरिया,सहसचिव लकी गुप्ता,  कोषाध्यक्ष प्रतिक माटे सह असंख्य विदर्भ राज्य आंदोलन समिति चे चांदा (चंद्रपुर) जिल्हाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

Previous Post Next Post