10 वी पास वाल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
पोस्टात 4200 हून अधिक पदांची भरती
(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक)संजय घुगलोत,दील्ली :- India Post GDS Recruitment 2020-21: भारतीय पोस्ट विभागात (India Post) ग्रामीण डाक सेवकांच्या 4200 हून अधिक पदांच्या भरतीसाठी 21 डिसेंबर रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्याअंतर्गत कर्नाटक पोस्टल सर्कल आणि गुजरात पोस्टल सर्कलसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS )च्या 4299 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. पोस्टल विभागातील जीडीएस पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. (India Post Recruitment 2020-2021 Gramin Dak Sevaks GDS Posts Gujarat Karnataka Postal Circle Job Vacany Online Apply)
India Post Recruitment 2020-21: पदांची संख्या
गुजरात आणि कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये जीडीएसच्या एकूण 4269 पदांची भरती होणार आहे.
गुजरात पोस्टल सर्कल (Gujarat Circle) – 1826 पोस्ट
कर्नाटक पोस्टल सर्कल (Karnataka Circle) – 2443 पोस्ट
GDS Recruitment: शैक्षणिक पात्रता
पोस्टल सर्कल भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डामधून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
India Post GDS Recruitment: वयोमर्यादा
टपाल खात्यात जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे.
GDS Recruitment: अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
निवड कशी होईल?
टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, तर गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल.
असे करू शकता अर्ज?
गुजरात टपाल विभागातील गुजरात आणि कर्नाटक पोस्टल सर्कलमधील जीडीएस पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ appost.in भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2021 आहे.
