Top News

सिंदखेड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मालमत्तेच्या चौकशी ची मागणी....!

सिंदखेड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मालमत्तेच्या चौकशी ची मागणी....!



  
(विदर्भ माझा न्युज 24),माहुर:-माहूर तालुक्या अंतर्गत असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी अतिसंवेदनशील असलेल्या वाई बाजार येथील अवैध व्यवसायिकांना पाठबळ देऊन गुन्हेगारांशी आर्थिक संबंध जोपासत आपल्या शासकीये पदाचा दुरुपयोग करून  तीन वर्षेच्या कार्यकाळात गैररित्या   भरमसाठ संपत्ती कमवलयाची  व २०१९ मध्ये नव्हेंबर महिन्यात वाई येथील उस्मान अकबानी यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणात पकडण्यात आलेल्या तीन आरोप्यापैकी एका अरोप्यानी दिलेल्या तोंडी जवाबत गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव सांगितले असता सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी परस्पर त्या व्यक्तीशी संपर्क करून आर्थिक व्यवहार केल्याचा समजते व वाई येथे खुलेआम चालू असलेल्या अवैध दारू विक्री, मटका, गुटखा सारख्या अवैध धंदयाल पाठबळ दिल्याचा आरोप आपल्या लेखी तक्रारीत वाई बाजार येथील शेतकरी अमजद खान हैदर खान पठाण यांनी दि१२ डिसेंबर २०२० रोजी माहूर पो. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केले असून
प्रतीलीपी माहितीस्तव मा.ना.बच्चू कडू पशुसंवर्धन शालेय शिक्षण महिला व बाल विकास राज्यमंत्री, व नांदेड जिल्हाधिकारी डॉ. वीपिन  ईटणकर, जिल्हा सहायक अधिकारी कीर्तिकुमार पुजार,  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, यांच्याकडे केली
असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश संबंधित वरिष्ठ अधिकारी संबधित विभागाला देऊन वाई बाजार येथे पोफावलेले अवैध धंदे कधी बंद करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Previous Post Next Post