प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाला यश.
जुने बस स्टँड ते नवीन बस स्टॅन्ड पर्यंत येणाऱ्या रस्त्यावरच्या खांब्यावर बसणार आता लाईट.
आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुक रिंगणात प्रहार जनशक्ती पार्टी तिसरी आघाडी म्हणून उतरण्याचे संकेत
(विदर्भ माझा न्युज 24),वाई :- दि. ४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वाई जुने बस स्टँड ते नवीन बस स्टँड पर्यंत गावात येणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या खांबावर पथदिवे बसवण्यात यावे या करिता प्रहार जनशक्ती पक्षाने जण आंदोलनाचा इशारा निवेदना द्वारे वाई ग्रामपंचायतीला दिला होता, उशिरा का होईना पण ग्रामपंचायतीला प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या अर्जाची दखल घ्यावी लागली. वाई ग्रामपंचायतच्या आजवरच्या निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत दोनच गटांनी निवडणूक लढवली असून तिसरा गट तयार झाला नाही किंवा होऊ दिला नाही हा विषय गावातील नागरिकांसाठी चिंतनाचा आहे. परंतु ग्रामपंचायतीवर विराजमान सत्ताधारी गटाच्या विरोधात विरोधी गटानी साडेचार वर्षाच्या कार्यकाळात कधीही कुठल्याही कामाला विरोध दर्शविला नसून किंबहुना एखादा विकास काम व्हावा या उद्देशाने एक साधा अर्ज सुद्धा दिलेला नाही.
परंतु निवडणुकीच्या काळात दोन्ही गट एकमेकांचे जानी दुश्मन असल्याचे मतदारांना दाखवण्यासाठी नवनवीन मुद्दे उपस्थित करतात.पण नव्यांनेचा अगगमन केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने विकास कामासंदर्भात सक्रियता दाखवली आहे. आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुक रिंगणात तिसरी आघाडी म्हणून उतरण्याचे संकेत दिले आहे. वाई ग्रामपंचायतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या अर्जाची दखल घेत दोन लाखाचा इस्टीमेंट तयार करून 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून जुने बसस्टॅण्ड ते गावात येणाऱ्या नवीन बसस्टॅण्ड च्या कडेला खांबावरचे बंद पडलेले पथ दिवे काडून नविन पथ दिवे बसविण्यास वाई ग्रामपंचायतीला भाग पाडले आहे. हा प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या निवेदनाला यश आल्याचा नागरिकांतून बोलले जात आहे.