Top News

Ballarpur : गोल पुलिया रस्त्याचे बांधकाम; ३ ते १३ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीत बदल




बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गोल पुलिया येथील रस्त्याचे बांधकाम रेल्वे विभागामार्फत करण्यात येणार आहे. या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ३ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गोल पुलिया मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

या कालावधीत दुचाकी, चारचाकी वाहने तसेच रुग्णवाहिका वगळता इतर सर्व प्रकारच्या जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या वाहतूक बदलाची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि रस्ता बांधकामाच्या काळात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post