Top News

Tobacco Control Award 2026 : उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. श्वेता सावलीकर सन्मानित

 Tobacco Control Award 2026 : उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. श्वेता सावलीकर सन्मानित



चंद्रपूर, दि. 19 : नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सौरभ खांडरे (सावलीकर) यांना “नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन अवॉर्ड 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

नवरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थांमार्फत देशातील 13 राज्यांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, तंबाखूमुक्त शाळा आणि निरोगी वातावरण निर्मितीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी गौरव करण्यात येतो.

यावर्षी भारतातील विविध राज्यांतील सहा व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून डॉ. श्वेता सावलीकर यांची निवड करण्यात आली. तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या जनजागृती आणि प्रभावी कामाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Previous Post Next Post