Top News

Women Empowerment Review Meeting Held : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नवतेजस्विनी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा

 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नवतेजस्विनी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा





चंद्रपूर, दि. 19महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत जिल्ह्यात महिला बचतगटांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काढोळे, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये माविममार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील महिला बचतगटांद्वारे सुरू करण्यात आलेल्या कार्पेट निर्मिती, बांबू वस्तू निर्मिती आणि अगरबत्ती प्रकल्पांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद व माविम यांच्या संयुक्त विद्यमातून विक्री केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

तसेच उमेदच्या धर्तीवर माविमच्या बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन विभागास सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवतेजस्विनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे त्रैमासिक आयोजन करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या.

42 उपप्रकल्पांमधून 7,755 महिलांना रोजगार

वर्ष 2026-27 मध्ये मशरूम कल्टीवेशन, शेवगा उत्पादक क्लस्टर आणि कोठार निर्मिती यांसारखे उपप्रकल्प राबविण्यात येणार असून, यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच खनिज क्षेत्र विकास निधीतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या 42 उपप्रकल्पांची माहिती दिली. या प्रकल्पांमधून एकूण 7 हजार 755 महिलांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post Next Post