Top News

SAIL–CFP चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

SAIL–CFP चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा



 चंद्रपूर : सेल–चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट (CFP) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महान महिलांच्या योगदानावर आधारित व्हिडिओ शो, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच “महिलांचे अंतर्गत सौंदर्य” या विषयावर कोलाज तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. याशिवाय विविध मनोरंजनात्मक खेळांचाही समावेश होता. 


या कार्यक्रमात नियमित महिला कर्मचारी, कंत्राटी कामगार तसेच अप्रेंटिस यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मतमांडणी सत्रात सहभागी महिलांनी आपले अनुभव व्यक्त करत महिला असल्याचा अभिमान व्यक्त केला तसेच CFP, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याबाबत आपले विचार मांडले.


कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन श्यामली आर. लोखंडे, एएम – एचआर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान CFP चे कार्यकारी संचालक पी. मुरुगेसन यांनी भूषविले.

या प्रसंगी डी. व्ही. रवी चंदर, सीजीएम (मेंटेनन्स) व अतिरिक्त प्रभार एम अँड सी, के. एस. सुरेश, सीजीएम – प्रोजेक्ट, आर. डी. गायकवाड, सीजीएम – वर्क्स, एल. प्रवीण कुमार, जीएम प्रभारी – एचआर, शोभा शिवसंकऱण, जीएम प्रभारी – एफ अँड ए, उमेश एम. उके, डीजीएम – एचआर, अजय कुमार, एजीएम – ईडी सचिव तसेच शकील अहमद खान, जेएम – एचआर उपस्थित होते.

स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली तसेच सर्व सहभागी महिलांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.कार्यकारी संचालक पी. मुरुगेसन यांनी सांगितले की महिलांना जन्मापासून समान संधी देऊन त्यांना सक्षम व सशक्त बनविणे गरजेचे आहे. आज महिला सर्व क्षेत्रांत आघाडीवर असून अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्येही त्या यश संपादन करत आहेत. CFP मध्येही महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.

एफ अँड ए विभाग प्रभारी शोभा शिवसंकऱण यांनी सांगितले की महिलांनी आपल्या कर्तृत्व आणि क्षमतेच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात हे सिद्ध केले आहे. SAIL-CFP मधील विविध विभागांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या बहुपदरी काम करण्याच्या क्षमतेचे कौतुक आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सुरेखा आर. सरोदे, सेक्शन ऑफिसर – एचआर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयन एचआर विभागाने केले.

Previous Post Next Post