वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; Forest Department सतर्क
तळोधी : तळोधी परिसरात (Talodhi Area) वाघाच्या (Tiger Attack) हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. 25 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7:45 वाजताच्या सुमारास उपक्षेत्र तळोधी अंतर्गत नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 89, मौजा सार्वला येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमिला अरुण वाडगुरे (वय 45 वर्ष, रा. तळोधी) या सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेल्या असताना वाघाने (Tiger) हल्ला करून ठार केले.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग (Forest Department) व पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक ए. जी. मने, वनरक्षक आर. यु. भरणे, बॉयोलॉजिस्ट राकेश आहुजा तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. गुहे व उपपोलीस निरीक्षक लांबट यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी (Postmortem) ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे पाठविण्यात आला.
या घटनेनंतर वन विभागाकडून (Forest Department Action) वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात Camera Trap लावण्यात आले असून गस्त (Patrolling) वाढविण्यात आली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष (Human-Wildlife Conflict) टाळण्यासाठी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृत महिलेचे पती अरुण भिकाजी वाडगुरे यांना तातडीची आर्थिक मदत (Immediate Financial Assistance) देण्यात आली आहे.
