Top News

इरई धरण परिसरात कासव शिजवताना दोघांवर कारवाई; Forest Department ची Action....RFO संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू

इरई धरण परिसरात कासव शिजवताना दोघांवर कारवाई; Forest Department ची Action....RFO संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू



चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्र (Moharli Forest Range) अंतर्गत इरई धरण (Irai Dam) परिसरात संरक्षित कासव (Protected Turtle) पकडून शिजवताना दोन जणांना पकडण्यात आले असून वन विभागाने (Forest Department) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास सितारामपेठ बिटातील मौजा भामडेळी येथील मच्छीघाट परिसरात ही घटना उघडकीस आली. आरोपी ज्योती शैलेश घंटसाल (वय 35) व शैलेश सोमनाद्री घंटसाल (वय 38, रा. कैकलूरु, जिल्हा कृष्णा, आंध्रप्रदेश) हे Indian Flap Shell Turtle (Lissemys punctata) पकडून शिजवून खात असताना आढळून आले.

वनरक्षक सुरेंद्र मंगाम व क्षेत्र सहाय्यक संजय जुमडे यांनी घटनास्थळी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी वनगुन्हा क्रमांक 09643/241056 अन्वये Wildlife Protection Act 1972 च्या कलम 9, 39, 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास उपसंचालक (Buffer) कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित वन्यजीवांची शिकार (Illegal Hunting) किंवा त्यांचे नुकसान करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे.

Previous Post Next Post