मूल येथे स्व. मा.सा. कन्नमवार यांची १२६ वी जयंती विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी होणार
मूल | संदीप तेलंग उपजिल्हा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मा. सा. कन्नमवार यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मूल यांच्या वतीने भव्य जयंती सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी मा. सा. कन्नमवार सभागृह, मूल येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० ते ९.०० वाजेपर्यंत बेलदार समाज भवन, मूल येथे स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेस पुष्पमालार्पण करून करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.१५ वाजेपर्यंत बेलदार समाज भवन येथून मा. सा. कन्नमवार सभागृहापर्यंत भव्य मिरवणूक (रॅली) काढण्यात येणार आहे. सभागृहात पोहोचल्यानंतर स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेस पुष्पमालार्पण करण्यात येईल. सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत मा. सा. कन्नमवार सभागृह येथे मुख्य कार्यक्रम होणार असून, यामध्ये दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शन, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३.०० ते ५.०० वाजेपर्यंत समाजातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व नाटिका, तर सायंकाळी ५.०० ते ५.३० वाजेपर्यंत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे. समारोपानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत एकल नृत्य, समूह नृत्य व नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन प्रा. विवेक गोर्लावार, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी संजयज मुत्यालवार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चंद्रपूर राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून विजयराव जिडगिलवार सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवापूर, कुणाल येनगंधेलवार उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर , डॉ. मनोहरराव मुद्देशवार माझी डीन मेडीकल कॉलेज नागपुर व सुनील कारडवार यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी पांडुरंग गुज्जनवार व बंधू तसेच डॉ. सुभाष रेड्डीवार, माजी अध्यक्ष बेलदार समाज, मूल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
आयोजक व सभासदांचे योगदान
या जयंती सोहळ्याचे आयोजन बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार, कार्याध्यक्ष विवेक मुत्यालवार,उपाध्यक्ष प्रशांत देशकर व महेश गाजुलवार, सचिव सुरेश गुज्जनवार,कोषाध्यक्ष संतोष आकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यासह पुरुष सभासद म्हणून बंडू साखलवार, संदीप ओलावर, सचिन बोर्डावार, विवेक कामीडवार, पंकज महाजनवार, संजय रेगुलवार, गणेश पेंटेवार , गिरीधर गाजेवार सभासदांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच महिला मंडळाच्या वतीने सोनल श्रीगीशिवार (अध्यक्ष), पायल सोनुलवार (उपाध्यक्ष), सुषमा कमीडवार (सचिव), पल्लवी कन्नमवार (कोषाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली निशा लगडेवार , सोनल बालमवार, स्नेहा मैदमवार , हिना प्रेमलवार , सुषमा चिलके, नेहा निलेश चिलके,जानवी पुल्लावार, सोमती ठाकूरवार, मनीषा ठाकूरवार, मोनाली बोर्डावार , प्रिया पुल्लावार, निता बोर्डावार, वैशाली कापुलवार राधिका बुक्कावार आदी महिला सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.
तसेच दि. १६ जानेवारी २०२६ रोजी बेलदार समाज महिला मंडळ, मूल यांच्या वतीने बेलदार समाज भवन येथे महिलांसाठी वाणवाटप व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांना समाजबांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
